Vidharbh Politic's : दिल्लीश्वरांचा पटोलेंना दुसरा धक्का; विजय वडेट्टीवार नानांना पुन्हा ठरले भारी!

Congress News : ती निवडणूक नाना पटोले यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. कारण, ते पहिल्या रांगेतील नेते झाले होते.
Vijay Wadettiwar-Nana Patole
Vijay Wadettiwar-Nana PatoleSarkarnama

Nagpur News : काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पुन्हा एका धक्का दिला आहे. पटोलेंचा विरोध झुगारून विजय वडेट्टीवार यांना पक्षाने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद दिले. त्यानंतर काही दिवसांतच नानांचा हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघाची निरीक्षक म्हणून जबाबदारी पुन्हा वडेट्टीवार यांच्यावरच सोपवली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचे दुःख असताना मतदारसंघात वडेट्टीवार यांना आणल्याने नानांवर पक्षश्रेष्ठी खप्पामर्जी सुरू झाल्याचे मानले जात आहे. (Vijay Wadettiwar's again political grudge against Nana Patole)

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची अवघ्या चार दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. वडेट्टीवार यांच्या नावाला नाना पटोले (Nana Patole) यांचा विरोध होता. त्या खुर्चीवर नानांना दुसऱ्यालाच बसवायचे होते. मात्र, दिल्लीतील नेत्यांनी पटोले यांच्या शिफारशीकडे दुर्लक्ष केले. आताही नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणून वडेट्टीवर यांची नियुक्ती केली आहे.

Vijay Wadettiwar-Nana Patole
Ajit Pawar News : भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला?; अजितदादांनी अमित शहांसमोरच सगळं सांगून टाकलं...

नागपूरमधून मागची लोकसभा निवडणूक नाना पटोले यांनी लढवली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नानांनी चांगलीच लढत दिली होती. नागपूरशी त्यावेळी पटोले यांचा फारसा संबंध नव्हता. असे असतानाही त्यांनी गडकरी यांना तडजोडी करण्यास भाग पाडले होते. ती निवडणूक नाना पटोले यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. कारण, ते पहिल्या रांगेतील नेते झाले होते.

नानांनी पुढे राजकीय हुशारी दाखवून परत आपल्या भंडारा जिल्ह्यात परतले आणि विधानसभा निवडणूक लढविली. पक्षाने त्यांना विधानसभेचे अध्यक्ष केले. मात्र, पटोले यांना त्यात पदामध्ये रस नव्हता. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ते मोकळे झाले. विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी ते प्रदेशाध्यक्ष झाले. ते भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांच्या आणखी जवळ गेले. असे असले तरी आता त्यांना धक्के बसण्यास सुरूवात झाल्याचे दिसून येते.

Vijay Wadettiwar-Nana Patole
Ajitdada praised Shah : अमित शहांचे गुजरातपेक्षा महाराष्ट्रावर अधिक प्रेम; अजितदादांनी कारण सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पटोले यांच्या विरोधातील तक्रारींकडे लक्ष देणे सुरु केले आहे. बाळासाहेब थोरात आणि पटोले यांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी नेमलेली चेन्नीथाला समिती त्याचेच उदहारण होते. आता वडेट्टीवार यांच्या माध्यमातून पाठोपाठ दोन धक्के देऊन पक्षश्रेष्ठींनी पटोले यांना बाजूला करण्यासाठी पाऊल उचलले आहेत, असे संकेत राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहेत.

Vijay Wadettiwar-Nana Patole
Ichalkaranji News : इचलकरंजीसाठी मोठी बातमी; मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष,कागलमधील नेत्यांच्या उपस्थितीत होणार बैठक

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले यांना हटवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील लॉबी आधीपासूनच सक्रिय आहे. विदर्भातील वडेट्टीवर यांना विरोधी पक्षनेते केल्याने आता अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील करावा, अशी मागणी पुढे केली जाऊ शकते. प्रादेशिक समतोल साधण्याच्या नावाखाली नाना पटोले यांना पदावरून दूर केले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com