Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News: राजकारणात छापा-काटा होईल, कुस्ती होईल तेव्हा पाहू...; गुलाबरावांनी विरोधकांना सुनावलं

Gulabrao Patil Attack on opposition party: शेतकऱ्यांना झटका मशीन दिल्यावर शेतकरी मला मतदान करून समोरच्याला झटका देतील,'असं मिश्किल वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon News: मतदारसंघातील विकास कामांवरुन विरोधकांनी शिंदे गटातील नेते, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्याला गुलाबरावांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुका जवळ आल्याने गुलाबराव पाटलांनी विकास कामांचा सपाटा लावला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. (Gulabrao Patil Attack on opposition party)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुका आल्या म्हणून विकास कामे किंवा सामाजिक कामे करीत नाही, विधानसभा निवडणुकांनाच म्हणजे माझ्या मतदानाला अद्याप एक वर्ष आहे. माझे काम तीन वर्षांपासून सुरू आहे, असं म्हणत जळगाव ग्रामीण मतदार संघातील विकास कामांवरून टीका करणाऱ्या विरोधकांना गुलाबरावांनी सुनावलं.

निवडणुकांना आल्या म्हणून मी विकास कामे करीत नाही. राजकारणात काय छापा काटा होईल...,कुस्ती होईल तेव्हा पाहू..पण जे सामजिक काम मी करतोय त्याच्यामुळे रात्री शांत झोप लागते, असे गुलाबराव म्हणाले. पाळधी (जळगाव) येथे दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात गुलाबराव पाटील विरोधकांवर फटकेबाजी केली.

शेतकरी मला मतदान करून समोरच्याला झटका देतील...

'मला जे कार्यकर्ते, पदाधिकारी मिळाले, लाभले त्यांचा मला अभिमान असून हीच माझी कमाई आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना पिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा असलेल्या झटका मशीनचे वाटप केले जाणार आहे. शेतकऱ्यांना झटका मशीन दिल्यावर शेतकरी मला मतदान करून समोरच्याला झटका देतील,'असं मिश्किल वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT