Jalgaon News: राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची धडाडणारी मुलुखमैदानी तोफ म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख आहे.त्यांनी शिक्षकदिनाच्या दिवशीच शिक्षकांना 'राजकीय' सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिवसेना नेते गुलाबराव पाटील हे त्यांच्या अजबगजब वक्तव्य,भाषणं आणि शेरोशायरी बेधडक व वादग्रस्त विधानं यांनी नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चेत असतात.आता त्यांनी शिक्षकदिनाच्या दिवशी जळगावमधील एका कार्यक्रमात मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना आम्ही भाजप ज्या पद्धतीने पक्ष फोडतो, त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे असं अचंबित करणार वक्तव्य केलं आहे.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “भाजपवाले ज्या पद्धतीने आमचे लोकं फोडतात,पक्ष फोडतात, तसेच या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात असं सगळं करतात,त्याच पद्धतीने आता मराठी शाळांमधीलली विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी म्हणून शिक्षकांनीदेखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना फोडले पाहिजेत असा धक्कादायक सल्ला विधान पाटील यांनी शिक्षकांना दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली. ते म्हणाले, मराठी शाळांमधील पटसंख्या टिकवणं हे सध्या एक फार मोठं आव्हान बनलं आहे. त्यात कुटुंब नियोजनाची व्याख्या हाही मोठा विषय आहे. आता हम दो हमारे दो और इंग्लिश मे जाने दो हा मोठा कार्यक्रम बनला आहे, असाही टोला आपल्या भाषणात पाटील यांनी लगावला.
तसेच पुढे जाऊन त्यांनी आत्ताच्या घडीला सरकारी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांची जशी स्पर्धा आहे तशी आता खासगी इंग्रजी शाळांमध्ये देखील मोठी स्पर्धा तयार झाल्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे.
यापूर्वी एका शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी ज्याप्रमाणे जेवणात लोणचं आहे, तेवढी इंग्रजी आपल्याला आली पाहिजे असं म्हटलं होतं. तसेच आपल्या भाषेचा आहे तो आदर राखलाच पाहिजे. आदर्श शिक्षकांचे मुलं हे मोठ्या पदावर असतात. पण पुढाऱ्यांचे मुलं हे फार काही मोठ्या ठिकाणावर नसतात. राजकारणी लोकांकडे फार प्रॉपर्टी असते. पण आपली मुलं कशी निघाली ही आपली मोठी प्रॉपर्टी असल्याचं बेधडक विधानही पाटील यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात केलं होतं.
त्यांनी शिक्षकांच्या आरोग्याबाबतही गंभीर विधान केलं होतं. त्यांनी बऱ्याच शिक्षकांना शुगर , बीपी नाही. मात्र 288 पैकी 212 राजकारण्यांना बीपी शुगर असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी आदर्श शिक्षक घडवायचे असतील तर मराठी शाळांची पटसंख्या वाढवा असंही म्हटलं होतं.
जसे भारतीय जनता पार्टीवाले कोणालाही आपल्या पक्षात घेतात. तसे तुम्ही इंग्लिश मीडियमची मुलं फोडली पाहिजे, जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी घेतली पाहिजे असं वक्तव्य केल्यामुळे त्यांची चर्चा झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.