Farmer Loan Waiver: सरकारच्या पहिल्या लाभार्थी यादीत 9 लाख 44 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा झटका; आता 6 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज

CM Devendra Fadnavis Farmer Loan Waiver : सहकार विभागाने संबंधित बँकांना कर्जखात्यांची माहिती तपासून त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बँकांकडून माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 6 लाख शेतकऱ्यांचा सुधारित तपशील विभागाला प्राप्त झाला आहे.
Devendra Fadnavis Frmer Loan  Waiver .jpg
Devendra Fadnavis Farmer Loan Waiver .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँकांकडून कर्जखात्याशी संबंधित माहिती अपूर्ण मिळाल्याने तब्बल 9 लाख 44 हजार 376 शेतकरी पहिल्या लाभार्थी यादीतून वंचित राहिले होते. आता यापैकी सुमारे 6 लाख शेतकऱ्यांची सुधारित माहिती बँकांनी सहकार विभागाकडे सादर केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची माहितीही येत्या आठवडाभरात प्राप्त होण्याची शक्यता आहे.

सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर सहकार विभागाकडून त्याची पुन्हा छाननी केली जाणार आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी जाहीर करण्यात येणार असून, आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.

शेतकऱ्यांना फटका

कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात बँकांकडून प्राप्त झालेल्या माहितीची सहकार विभागाने छाननी केली. या प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांशी संबंधित माहितीमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले. काही प्रकरणांत शेतकऱ्याचे नाव, आधार क्रमांक, कर्जखाते, कर्जाची रक्कम तसेच अन्य तपशिलांमध्ये तफावत आढळून आली.

या त्रुटींमुळे पात्र असूनही अनेक शेतकऱ्यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही. अशा प्रकरणांची संख्या तब्बल 9 लाख 44 हजार 376 इतकी आहे.

Devendra Fadnavis Frmer Loan  Waiver .jpg
Maratha Reservation: सरकारच्या शिष्टमंडळाकडून पुन्हा चालढकल, मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी अखेर कठोर निर्णय घेतलाच

6 लाख शेतकऱ्यांची माहिती अपडेट

सहकार विभागाने संबंधित बँकांना कर्जखात्यांची माहिती तपासून त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बँकांकडून माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 6 लाख शेतकऱ्यांचा सुधारित तपशील विभागाला प्राप्त झाला आहे.

उर्वरित शेतकऱ्यांची माहितीही येत्या आठवडाभरात मिळेल, अशी माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे. त्यामुळे पहिल्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांना आता नव्या यादीची प्रतीक्षा आहे.

Devendra Fadnavis Frmer Loan  Waiver .jpg
Nitin Gadkari : दिल्लीच्या राजकारणातील महाराष्ट्राचा ‘वजनदार’ चेहरा : विरोधकही ऐकतात, सत्ताधारीही मानतात...

आधी पडताळणी, मगच कर्जमाफी

बँकांकडून सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर सहकार विभागाकडून तिची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीनंतर पात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध केली जाईल. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक राहणार आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.

शेतकऱ्यांनी कर्जखात्याचा तपशील तपासावा

दरम्यान, बँकांकडून सादर करण्यात आलेल्या माहितीमध्ये त्रुटी असल्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे पहिल्या यादीत नाव न आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेत जाऊन कर्जखाते, आधार क्रमांक, कर्जाची रक्कम आणि इतर तपशील योग्य आहेत की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com