Water Supply Minister Gulabrao Patil addresses a power distribution programme in Jalgaon, where his remarks on farmers and electricity supply triggered widespread political criticism. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil: 'वीज नसली तर शेतकऱ्यांनी कळ सोसावी; उद्योगाची अडचण झाली तर सरकारची अडचण होते' : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने संताप

Gulabrao Patil, Farmers, Power Supply: वीजपुरवठ्यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना वीज नसण्याची सवय असल्याचे विधान केले. या वक्तव्यावर विरोधक आणि शेतकरी संतप्त झाले असून राजकीय वाद निर्माण झाला.

Sampat Devgire

Power Supply: बेधडक विधाने आणि विरोधकांना अंगावर घेणारे मंत्री गुलाबराव पाटील आता स्वत:च अडचणीत आले आहेत. त्यांनी शेतकर्‍यांविषयी केलेलं एक विधान चांगलेच बुमरँग झाले असून, त्यामुळे विरोधकांनी मंत्री पाटील यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

जळगाव येथे झालेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यक्रमात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील भलतेच बोलून गेले. या कार्यक्रमातील त्यांच्या विधानामुळे विरोधकांनी त्यांना चांगलेच खडसावले असून, शेतकर्‍यांनीही याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमात मंत्री पाटील म्हणाले की, वि‍जेचा पुरवठा नसला तर उद्योजकांची मोठी गैरसोय होते. त्यांना कर्मचार्‍यांना पगार द्यावा लागतो. वीजपुरवठा नसेल तर त्यांची अडचण होते आणि सरकारचीही अडचण होऊ शकते. वीजपुरवठा नाही म्हणून उद्योग लावता येणार नाही अशी भूमिका ते घेतात, त्यामुळे ही समस्या शेतकर्‍यांनी समजून घ्यावी.

यापुढे बोलताना ते म्हणाले की, वीज नसेल तर शेतकर्‍यांना फारशी अडचण होत नाही. त्यांना त्याची सवय आहे. त्यामुळे वीज नसली तर शेतकर्‍यांनी थोडी कळ सोसली पाहिजे, कारण त्याने फारसे काही बिघडत नाही.

गुलाबराव पाटील यांच्या या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी मंत्री पाटील यांना खडेबोल सुनावताना म्हटले की, शेतकरी फक्त निवडणुकींमध्ये मतदान घेण्या पुरता आहे का? मतदान झाले म्हणजे शेतकरी काही कामाचा नाही असा समज गुलाबराव पाटील यांचा झाला असावा.

त्या पुढे म्हणाल्या की, गुलाबराव पाटील यांना देखील एक आठवडाभर उपाशी ठेवले पाहिजे, ज्यामुळे त्यांना शेतकर्‍यांची व्यथा आणि समस्या समजतील. शेतकर्‍यांना कळ सोसा असे म्हणणाऱ्या मंत्र्यांचे आणि त्यांच्या सरकारचे शेतकर्‍यांविषयी काय मत आहे, हे आता स्पष्ट झाले असून, एरवी विरोधकांवर टीकेची झोड उठविणारे मंत्री गुलाबराव पाटील आता स्वत:च्याच विधानाने अडचणीत आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT