Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांच्या वादग्रस्त विधानावर राजू शेट्टींनी खडसावलं; 'तर शेतकरी तुमचा कार्यक्रम...'

Raju Shetti Attacks Gulabrao Patil Over Controversial Statement on Farmers : महाराष्ट्रातील शेतकरी धोरणे, वीजपुरवठा आणि स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात टीका होत असतानाच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्मार्ट मीटरबाबत वक्तव्य करताना शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.
Gulabrao Patil
Gulabrao Patilsarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी "शेतकऱ्यांनी त्रास सहन करावा, पण उद्योजकांना नको" असे वादग्रस्त विधान केले आहे. ते जळगावमधील एका कार्यक्रमात बोलत होते. विजेअभावी शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकांचे मोठे नुकसान होत असल्याचे धक्कादायक विधान गुलाबराव पाटलांनी केल्याने आता सर्वत्र टीका होत आहे. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा शेट्टी यांनी निषेध करत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

जळगावच्या चिंचोली येथील वीज उपकेंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी, "आमची हात जोडून विनंती आहे की, शेतकऱ्यांना थोडासा त्रास झाला तरी चालेल. ते आम्ही सहन करून घेऊ. पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका. उद्योजकांना वेळेवर आणि सुरळीत वीज व सवलती मिळायला हव्यात."

"उद्योजकांची वीज बंद झाली तर त्याला मोठे नुकसान सहन करावं लागतं. उद्योग बंद असताना देखील मजुरांची मजुरी द्यावी लागते. वीज नसेल तर उत्पादन निघत नाही. या विजेच्या अडचणीमुळेच आता नवीन उद्योजकाला उद्योग सुरू करताना विचार करावा लागतो," असे विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

Gulabrao Patil
Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटील यांनाही स्मार्ट मीटरचा शॉक; घरचे वीज बिल 5 हजारांवरून थेट 20 हजारांवर

या विधानामुळे गुलाबराव पाटील अडचणीत येण्याची शक्यता असून, उद्योजकांची बाजू घेत त्यांनी शेतकऱ्यांना कमी लेखणारं विधान केलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या वक्तव्याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे. या विधानावरून विरोधकांनी महायुती सरकारला घेरलं असून, गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

दरम्यान, याच वक्तव्यावरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे. शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेत, "महायुती सरकारचा शेतकऱ्यांबाबत दृष्टिकोन कसा आहे, हे गुलाबराव पाटलांनी प्रातिनिधिक स्वरूपाने दाखवून दिले. एक तर शेतकऱ्याला दिली जाणारी वीज ही उरली, सुरली, उष्टी, खरकटी आहे.

Gulabrao Patil
Gulabrao Patil : 13 खात्यांचे मंत्री होता, तरी घर सोडलं ; गुलाबराव पाटलांनी जुन्या खपल्या काढल्या, खडसेंना घरवापसीवरुन चिमटे

कारण सगळ्यांना विजेचे वाटप झाल्यानंतर उरली तर ती शेतकऱ्यांना दिली जाते. जी कमी दाबाची आणि निकृष्ट दर्जाची असते. अशी वीज शेतकऱ्यांना देताना देखील सरकारच्या मंत्र्यांचा जर का असा आविर्भाव असेल, तर त्यांनी आपण स्वतः ग्रामीण भागातून निवडून येतो, याचे भान ठेवावे," असा सल्ला वजा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच, "भविष्यात शेतकरीच तुमचा कार्यक्रम करून टाकतील," असा संताप त्यांनी गुलाबराव पाटलांच्या विधानावर व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com