Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil : "मंत्रिपदाचा सट्टा लावून शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला.."; ठाकरेंना यामुळे सोडलं ; गुलाबराव पाटलांनी..

सरकारनामा ब्युरो

Gulabrao Patil : "मंत्रिपदाचा सट्टा लावून आम्ही शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला," असे विधान शिवसेनेचे नेते, पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतेच केले आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा येथील कार्यक्रमात पाटील बोलत होते.

राज्यातील सत्तासंघर्षात सुरवातीला गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले नव्हते. त्यानंतर ते तीन दिवसांनी गेले. आठ मंत्र्यांनी राजीनामा देत गुवाहाटी गाठले होते, यात गुलाबराव पाटील हेही होते. या सत्तासंघर्षाबाबत पाटील यांनी काल (रविवारी) स्पष्टीकरण दिले.

गुलाबराव पाटील म्हणाले, "उद्धव ठाकरे हे चुकीच्या मार्गाने जात जात असल्याची कल्पना आली होती. त्याची कल्पना आम्ही त्यांना दिली. त्यांना विनंतीही केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास सांगितलं. मात्र तुम्हाला जायचं असेल तर जा असे संजय राऊत यांनी म्हटलं. त्यामुळे मीही मंत्रिपदाचा विचार केला नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन जात असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला,"

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर मागच्या 9 महिन्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार टीका होताना दिसून येत आहे. दरम्यान वादग्रस्त वक्तव्याने प्रसिद्ध असणारे गुलाबराव पाटील यांनी पुन्हा ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. मागच्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंमुळे विकास झाला नसल्याचे खापर गुलाबराव पाटील यांनी फोडले आहे.

"आपल्यातला एक मराठा चेहरा आपल्यापासून लांब जात आहे. तो जाता कामा नये, हे उद्धव ठाकरेंना समजावलं होतं. उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना त्यांना हात पाय जोडून विनंती केली होती. नागपूरपासून तर दादरपर्यंत सर्व गेले त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदार संघात विकास करू शकलो नसतो," असे गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील म्हणाले, "कामाला उत्तर द्या आणि कामानेच बोला. शेतकऱ्यांना आणि जनतेला काम हवंय. बोलबच्चन, अमिताभ बच्चन नको. त्यामुळे खोके बोलून विकास होत नाही, तर खोक्यांचा विकास झाला पाहिजे. खोके देऊन लोकांची कामं केल्या गेली पाहिजे आणि ते काम मी करत आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT