Hasan Mushrif Wife Saira Mushrif Reaction : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आज पहाटेपासून ईडीची कारवाई सुरु आहे.
ईडीचे सात ते आठ अधिकारी पथकासह मुश्रीफांच्या घरी कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुश्रीफ सध्या मुंबईत असल्याची माहिती आहे. त्यांच्या कागलच्या घरी केवळ महिला आणि मुले आहेत.
आज अचानक ईडीचे अधिकारी आल्याने मुश्रीफांच्या पत्नी सायरा या संतापल्या. त्यांनी अश्रू अनावर झाले. "ईडीचे अधिकारी अजून आम्हाला किती त्रास देणार, असा त्रास देण्याऐवजी आम्हाला गोळ्या घाला," असे सांगत सायरा भडकल्या. त्या माध्यमांशी बोलत होत्या. दीड महिन्यातच दुसऱ्यांदा अशा पद्धतीने ईडीने ही कारवाई केली आहे.
मुश्रीफ यांच्या घराजवळ कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. ते सायरा मुश्रीफ यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकार, राष्ट्रीय तपास यंत्रणा यांच्याविरोधात मुश्रीफ समर्थक घोषणा देत आहेत. पोलीस त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ईडीकडून काल (10 मार्च) साखर कारखान्याशी संबंधित कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु केल्याची वृत्त एएनआयने दिलं आहे. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुरगूड पोलिस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
फसवणुकीच्या आरोपाखाली कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकवण्यासाठी आणि अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा पाठी लावण्यासाठी ‘हेतुपुरस्सर’ गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा मुश्रीफ यांनी तो रद्द करण्याची मागणी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी 24 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालाने आदेश काल (शुक्रवारी) दिले आहेत.
मुश्रीफ यांच्या कोणत्याही प्रकरणाचा थेट संबंध नसतानाही सोमय्यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत आणि एफआयआरची काँपी सर्वात आधी कशी मिळते, असा प्रश्न न्यायालयाने आज विचारला.या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.