Gulabrao Patil, Sanjay Raut Latest News
Gulabrao Patil, Sanjay Raut Latest News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमच्या मतांवर निवडून आलात, त्याची तरी जाण ठेवा : गुलाबरावांनी राऊतांना सुनावले..

सरकारनामा ब्यूरो

Gulabrao Patil : शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोणताही मतदारसंघ नाही, जनतेतून कसे निवडून येतात हे त्यांना माहित नाही. त्यामुळे ते आमच्यावर टीका करीत असतात. मात्र, त्यांनी ते आमच्या मतांवर खासदार झालेत. त्याची तरी जाण ठेवावी,असा सणसणीत टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राऊतांना लगावला आहे. ते सत्तांतरानंतर पहिल्यांदाच आज आपल्या जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील त्यांच्या निवासस्थानी आले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत यांचं टीका करणं हे कामच आहे. कारण त्यांना कोणताही मतदारसंघ नाही. जनतेतून कसे निवडून येतात हे माहित नाही. आम्हीच त्यांना निवडून दिले आहे. ते आमच्या मतावर निवडून आल्याने त्यांनीच आमच्यावर टीका करतांना याची जाण ठेवायला पाहिजे, अशी जळजळीच टीका त्यांनी राऊतांवर केली. तसेच बंड का केले याबाबतही स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, शिवसेना संपण्याच्या मार्गावर होती, हे आम्ही पाहू शकत नव्हतो. याबाबत आम्ही अनेकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सांगितले मात्र, आमचे मत ऐकले गेले नाही, त्यामुळे आम्हाला फक्त शिवसेना वाचविण्यासाठीच हा निर्णय घ्यावा लागल्याचे पाटलांनी सांगितले.

दरम्यान, पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामध्ये सहभाग घेत त्यांनी थेट गुवाहाटी गाठली होती. यानंतर त्यांच्यावर शिवसेनेकडून आणि खासकरून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला होता. शिंदेंच्या बंडाला यश आल्यानंतर भाजपच्या समर्थनाने शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने विधिमंडळात बहूमतही सिद्ध केले. यानंतर शिंदेबरोबर गेलेले बंडखोर आमदार आता आपल्या मतदारसंघात परतत आहेत. आज पाटीलही आपल्या जिल्ह्यात आले असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि आपण बंड का केलं याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT