शिंदे गटासोबत जाऊनही राठोडांना दिलासा नाहीच; चित्रा वाघ झाल्या पुन्हा आक्रमक

Sanjay Rathod|Chitra Wagh : माझा हा लढा चालूच राहणार, असे चित्रा वाघ म्हणाल्या...
Chitra Wagh Latest News, Sanjay Rathod Latest News
Chitra Wagh Latest News, Sanjay Rathod Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Rathod : मी अजूनही संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विरोधातील माझा खटला मागे घेतलेला नसून त्यांना क्लीन चीट देणाऱ्या पोलिसांची चौकशी व्हायला हवी, शिवाय शिवसेनेचे (Shivsena) नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांचा जामीन रद्द करण्याची मंत्रालयात पाठवण्यात आलेली फाईल परत का पाठवण्यात आली. याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप (BJP) महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे. (Chitra Wagh Latest News, Sanjay Rathod Latest News)

Chitra Wagh Latest News, Sanjay Rathod Latest News
संजय राठोड शिंदे गट सोडायला तयार; 'मातोश्री'च बोलावणं आलं तर पुन्हा जाईल

चित्रा वाघ या पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अनोळखी मुलीच्या खुनाच्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि माजी मंत्री राठोड यांना पुजा चव्हाण प्रकरणात क्लीन चीट देणाऱ्या पोलिसांचीच चौकशी करण्याची मागणी केली. तसेच बलात्काराच्या गुन्ह्यातील कुचिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी मंत्रालयात पाठवलेली फाईल ही परत का पाठवण्यात आली याची देखील चौकशी व्हायला हवी. राठोड हे भाजप सोबत आलेल्या शिंदेगटासोबत आले असले तरी मी काही केस मागे घेतलेली नाही. माझा हा लढा चालूच राहणार आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Chitra Wagh Latest News, Sanjay Rathod Latest News
'मातोश्री, बाळासाहेब, उद्धव ठाकरेंवर कधीही टीका करणार नाही'

2019 साली शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडून राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि कॅाग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन करत सरकार स्थापन केलं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या सरकारमध्ये संजय राठोड हे देखील वन मंत्री होते. मात्र, त्यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी भाजपने सरकारवर चांगलाच हल्लाबोल करत त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले होते. या प्रकरणी भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या कमालीच्या आक्रमक झाल्या होत्या. मात्र, आता एकनाथ शिंदे सोबत बंडखोरी करत राठोड यांनी भाजप सोबत स्थापन केलेल्या सरकारला पाठिंवा दिल्याने त्यांच्या अडचणी कमी होतील आणि त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळेल, असे बोलले जात होते. मात्र, वाघ यांनी पुन्हा राठोडांबाबत आक्रमक झाल्याने बंडखोर आमदार आणि भाजपमध्ये काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Chitra Wagh Latest News, Sanjay Rathod Latest News
Hingoli : बांगरांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचा हिंगोलीतील नवा `सरदार` कोण?

शिंदे -भाजप युती झाल्याने आणि शिंदे मुख्यमंत्री झाल्याने शिवसेना बंडखोर आमदारांमागील केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा आता कमी होईल आणि चौकशी सुरू होत्या त्या थांबतील, असे बोलले जात होते. मात्र आज वाघ यांनी राठोडांचे जुने प्रकरण पुन्हा उकरून काढत त्यांना पोलिसांकडून क्लीन चीट कशी देण्यात आली या पोलिसांचीच चौकशी करण्याची आणि कुचिक यांचा जामिन रद्द करण्याची फाईल परत आल्याची चौकशीची मागणी केल्याने पुन्हा एकदा राजकारण तापण्याचे चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, आज संजय राठोड हे बंडखोरी केल्यानंतर प्रथमच आपल्या दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघात गेले. त्यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्तांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरी का केले याबाबत स्पष्टीकरण देतांना आजही आपण शिवसेनेत आहेत आणि आपले नेते हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असून आपल्याला आजही 'मातोश्री'वरून बोलावणं आल तर आपण जायला तयार असल्याचं म्हटलं होतं. नेमक त्यांच्या या वक्तव्यानंतर वाघ यांनी पुन्हा पुजा चव्हाणं प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. यामुळे बंडखोर आमदार आणि भाजपमध्ये सर्वच काही आलबेल नाही, अशी चर्चा रंगत आहे. आता वाघ यांच्या वक्तव्यावर राठोड किंवा मुख्यमंत्री शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com