Maharashtra politics : जळगाव जिल्ह्यात भाजपची ताकद सर्वांधिक आहे. भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटानेही पक्षाची ताकद वाढविण्यासाठी जिल्ह्यात मेळावे घेऊन यापूर्वीच अनेक दिग्गजांना गळाला लावत पक्षात प्रवेश घडवून आणले आहेत. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाही अॅक्शन मोडवर आली असून जोमाने तयारीला लागली आहे.
उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाध्यक्ष एकनाथ शिंदे 10 किंवा 12 तारखेला जळगावमध्ये आयोजित पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी जिल्ह्यातील काही माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत शिवसेनेचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी नेमके कोण कोणते माजी आमदार गळाला लावले आहेत याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
गेल्या वेळी महायुतीच्या घटक पक्षांनी सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या होत्या. मात्र यंदा काहीसे वेगळे वारे वाहताना दिसत आहेत. गुलाबराव पाटील यांनी तर भाजपला युती करा म्हणून कळकळीचं आवाहन केलं आहे. जागा वाटपात तडजोड करण्याची तयारी गुलाबरावांनी दाखवली आहे. आम्ही हवे तर फक्त ५० जागा लढवतो तुम्ही १०० लढा पण युती करा म्हणून भाजपला साद घातली आहे.
जिल्ह्यात महायुतीमधील पक्ष युती म्हणून न लढल्यास शिंदे गट व राष्ट्रवादीचा मोठा कस लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी म्हणून अजित पवारांनी आधीच माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील तसेच माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे यांना पक्षात प्रवेश देऊन ताकद वाढवून घेतली आहे. तर माजी आमदार दिलीप वाघ, अरूण पाटील यांना भाजपने यापूर्वीच गळाला लावले आहे. मग अशात शिंदे गटात नेमका कोणता माजी आमदार प्रवेश करणार आहे? कोणत्या पक्षाला गुलाबराव धक्का देणार आहे. हा प्रश्न पडला असून राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनीही कोणीही कसाही असला तरी त्याला भाजपमध्ये प्रवेश देण्याची भूमिका घेतली आहे. स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांना त्यांनी तसा सल्लाच दिला आहे. त्यामुळे आता शिंदे गटही यात मागे पडू नये म्हणून गुलाबराव पाटील यांनी कंबर कसल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.