Jalgaon News : विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला होता. जनतेनं कौल दिल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत काडीमोड घेत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा करत महाविकास आघाडी सरकार आणलं होतं. त्यानंतर त्यांनी सातत्यानं मोदी-शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं होतं.
पण विधानसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी भाजपशी जुळवुन घ्यायचं धोरण आखल्याचं समोर येत आहे. अशातच फडणवीसांनीही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शत्रू नाहीत असं विधान केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याच त्यांच्या विधानानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यानं मोठी प्रतिक्रिया देताना थेट फडणवीसांना जुनी आठवण करुन दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगावात शनिवारी(ता.11) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उद्धव ठाकरे हे आमचे शत्रू नाहीत या त्यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. ते म्हणाले,तुमच्याशी गोड बोलतायेत पण हे लोक कुणाचेच नाही याचा निश्चितपणाने विचार करावा अशी माझी विनंती आहे असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले,आपण फडणवीसांना सल्ला देण्याइतका मोठा माणूस नाही, पण शेवटी ज्यावेळी आपला पक्ष अडचणीत होता.मोदींचे सरकार यावे यासाठी प्रयत्न करत होता. त्यावेळी हे लोक कोणासोबत होते,आता यांच्याकडे काहीच राहिले नाही.त्यामुळे हे तुमच्याकडे येताहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) एकतर तू राहशील, नाहीतर मी राहीन,असं म्हटलं होतं.पण तेच आज फडणवीसांची पप्पी घेतायेत.आपलं स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी वाट्टेल तिथे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हांला जर एवढेच होते तर जेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते विचारधारा सोडू नका असं सांगत होते, त्याचवेळी आमचं ऐकलं असतं, तर आज हे दिवस आलेच नसते.कदाचित हेच त्यांच्या लक्षात आलं असेल, असा टोलाही मंत्री गुलाबरावांनी यावेळी लगावला.
विचारधारा सोडून जे लोक दूर जात होते.भगव्या झेंड्याकरता आम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत आलो आहे. जे विचारधारा सोडून आता पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर देवेंद्र फडणवीसांनीही थोडा विचार करावा, असा सल्लाही गुलाबरावांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिला.
ते आता काँग्रेस, राष्ट्रवादीशी फारकत घेत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा एक गट नाराज असून त्यांचं नेतृत्व बदलण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचं चित्र काही ठिकाण्यावर नाही.पुढच्या काळात त्यांचे डबडे वाजणार आहे,असा चिमटाही शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटलांनी महाविकास आघाडीला काढला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतीच एक मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी राज ठाकरे की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, राजकारणात काही पक्क नसते. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, आता राज ठाकरे झाले. आता राज ठाकरे मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असं फडणवीसांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.