Delhi Assembly Election : 'एनडीए' सरकारमधील 'या' मंत्र्याचा मोठा निर्णय; दिल्ली निवडणूक स्वबळावर लढणार, जागांचा आकडाही ठरला

NDA Government : दिल्ली विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसला एकट पाडत काही पक्षांनी थेट आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याचवेळी आता एनडीए सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यानं दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.
Delhi Vidhan Sabha Election
Delhi Vidhan Sabha Election Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : एनडीए सरकारविरोधात लोकसभा निवडणुकीवेळी दंड थोपटलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत आता धक्के बसण्याची चिन्हे दिसून येत आहे. याची सुरुवात दिल्ली विधानसभा निवडणुकीपासून (Delhi Assembly Election) सुरु होत असल्याची चर्चा आहे. कारण या निवडणुकीत इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसला एकट पाडत काही पक्षांनी थेट आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याचवेळी आता एनडीए सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यानं दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी याआधीच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पक्षाला स्थान न मिळाल्यानं आपली उघड-उघड नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही,असा हल्लाबोलही केला होता. आता याच आठवलेंनी थेट भाजपशी पंगा घेतल्याची चर्चा आहे.

कारण त्यांनी दिल्लीत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी थेट दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातच उमेदवारही दिला आहे. भाजपप्रणित एनडीए सरकारमधील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 15 उमेदवारांची नावंही जाहीर केली आहेत.

Delhi Vidhan Sabha Election
Government Decision on Liquor Prices : सरकार मोफत काहीही देत नाही; आता मद्यशौकिनांच्या खिशात हात घालणार

आठवले यांच्या आरपीआयकडून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातही शुभी सक्सेना यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देत मैदानात उतरवलं आहे. दिल्लीत सत्ताधारी आपसमोर भाजप आणि काँग्रेसचे आव्हान आहे.तिरंगी लढतीचा फटका आपला बसण्याची शक्यता आहे.तर मतविभाजनाचा फायदा आपल्याला होईल, या आशेवर भाजप आहे.

पण सद्यस्थितीत दिल्लीत काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. पक्षाचा एकही आमदार,खासदार नाही. एवढेच नाही तर इंडिया आघाडीतील एकही पक्ष काँग्रेसच्या बाजूने उभे राहायला तयार नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष मैदानात उतरले आहे.यातच एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या रामदास आठवले यांनीही दिल्ली विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे.

Delhi Vidhan Sabha Election
Anjali Damania : वाल्मिक कराडला कोण वाचवतंय; आठव्या आरोपीला मकोका का लावला नाही? अंजली दमानियांचा सवाल

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 15 जणांची उमेदवारी जाहीर करत आपलं नशीब आजमावायचं ठरवलं आहे. आरपीआयकडून शुभी सक्सेना-नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ, दीपक चावला-तिमरपूर, तजेंदर सिंह-कन्हैया संगम विहार,राम नरेश- मालवीय नगर, चांदणी चौक- लक्ष्मी - सुल्तानपूर माजरा, मंजूर अली -तुघलकाबाद ,विरेंदर तिवारी-पालम,आशा कांबळे - कोंडली, प्रतापगंज-रणजित यांसारख्या अनेक मतदारसंघ आणि उमेदवारांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com