Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जनतेचे राजे व्हायचे आहे, त्यासाठी शिंदेंबरोबर गेलो!

मंत्री गुलाबराव पाटील यांनी धानोरा येथे बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली.

Sampat Devgire

चोपडा : आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधकांनी (Shivsena leaders) काही बुद्धीहीन लोकांना (mindless people) सोडून आम्हाला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. आम्ही कुटुंबशाहीचे राजकारण (Family politics) करीत नसून आम्हाला जनतेचे राजे व्हायचे असल्याने आम्ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलो असल्याचे सांगत उद्धव ठाकरे (Uddhav Thackerey) यांच्यावर त्यांनी संधान साधले. (Minister Gualbrao patil disturb about Shivsena politics)

धानोरा (ता.चोपडा) येथे सोमवारी १५.९० कोटी (अक्षरी रक्कम पंधरा कोटी नव्वद लाख रुपये) या पेयजल योजनेचे भूमिपूजन पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार लताताई सोनवणे व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री श्री पाटील म्हणाले, मला पाणीवाला बाबा व्हायचं असून महाराष्ट्रातील जनतेची तहान भागवायची आहे. राजकारण हे फक्त गटार, वॉटर व मीटर वर चालते. हे सरकार रिक्षावाले, टपरीवाले सर्वसामान्यांचे सरकार असून आम्ही गद्दार नसून आम्ही शिवसेना मोठी केली व तुम्ही सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावरच मोठे झाले असल्याचा खोचक टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लावला.

माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आमदारांसहीत विद्यमान मंत्रीनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. गुलाबराव पाटील यांना पुन्हा पाणीपुरवठा मंत्री पद मिळाल्याने चोपडा तालुक्यात १.८८ कोटी रुपयांच्या पेयजल योजनेला मंजुरी मिळवून घेतली. धानोरा येथे मागील काळात पाणीपुरवठा योजना फक्त कागदावर ठेवून काहींनी जनतेशी गोड गोड बोलून त्यांना बाटलीत बंद केल्याचे सांगत थेट माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांना टोला लगावला.

धानोऱ्यात पेयजल योजनेचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणार असून लवकरच २५ कोटी रुपयांचे १३२ केव्हीचे सबस्टेशनचे काम देखील मार्गी लावण्यासाठी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना विनंती केली. पुढील पंचवार्षिक निवडणुकीत देखील विद्यमान आमदार लता सोनवणे ह्यांचीच उमेदवारी राहणार असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT