सोशल मीडियावरील पोस्टचा राग आल्याने राडा, परिस्थिती नियंत्रणात

पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यावर संशयीत साहिल भंगाळे पोलिसांच्या ताब्यात
Social media
Social media Sarkarnama
Published on
Updated on

सावदा : सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट व्हायरल करून धार्मिक भावना (Religious sentiments) दुखावल्या प्रकरणी सावदा (Savda) येथील पोलिस ठाण्यात (Police) अखेर एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील ही पोस्ट व्हायरल झाल्याने शहरात संतप्त जमावाने वाहनांची तोडफोड (Tense in the city) केली होती. त्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी याबाबत हस्तक्षेप केल्यावर परिस्थिती निवळली. (Tension release after police action in the city)

Social media
अस्वस्थ गुलाबराव म्हणाले, `या रवी राणांना कोणी तरी आवर घाला`

गुलाम फरीद शेख मंजूर (३८, मजुरी, बडा आखाडा, सावदा, ता. रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावदा माझे मूळ गाव असून मी गावातील अधिकाधिक लोकांना ओळखतो. मी साहील राजू भंगाळे (मेडीकलवाले) यांच्या मुलालाही ओळखतो. तो माझा इन्स्टाग्राम फ्रेंड आहे.

Social media
गिरीश महाजन म्हणाले, `आनंदाचा शिधा` घोषणेत घाईच झाली!

त्याने त्याच्या मोबाईलचे इन्स्टाग्राम ID _heart_of_phoenix_08_08_... यावरुन मुस्लीम धर्माच्या लोकांच्या भावना दुखावतील असा व्हिडीओ तयार करुन तो २९-१०-२२ ला सायंकाळी अंदाजे ८.१५ च्या सुमारास पोस्ट केलेला आहे. हा व्हिडीओ हा माझे मोबाईलमध्ये असलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटचे ID faridshaikh891 यावर मला आलेला असून तो मी पाहिला आहे. माझा परिचित दानिशखान अफजलखान याचे देखील इन्स्टाग्राम अकाउंटचे ID वरही तो व्हीडीओ आलेला असून त्यात मुस्लीम धर्माच्या लोकांच्या भावना दुखावतील अशा प्रकारे महंमद पैगंबर यांची प्रतिकृती दाखवण्यात आलेली आहे. एकेरी भाषेत उल्लेख करण्यात आलेला आहे. यापूर्वी देखील साहिने दोन वेळा मुस्लीम धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशी आक्षेपार्ह पोस्ट केलेली आहे. त्याने जाणिवपूर्वक ही कृती केलेली आहे. लोकांच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत. म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. दरम्यान या फिर्यादीनुसार साहिल भंगाळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरात शनिवारी रात्री दहाच्या सुमारास जमावाने अचानक रस्त्यावर उतरून दुचाकी आणि चारचाकींची तोडफोड केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने दखल घेतल्याने अनर्थ टळला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक तसेच निंभोरा व फैजपूरच्या पोलिसांसह राखीव सुरक्षा दलाची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली. शहरात तणावपूर्ण शांतता असून, उपविभागीय पोलिस अधिकारी गावित यांनी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती जाणून घेत योग्य त्या सूचना केल्या.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com