जळगाव : आपले (Jalgaon) कार्यतत्पर, उच्चशिक्षित व निर्व्यसनी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लोककलावंत संमेलनात जे वक्तव्य केले ते करण्यापूर्वी किमान भूतकाळातील घटनांचा अभ्यास केला असता, तर बरे झाले असते, अशी कोपरखळी माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी लगावली.
पालकमंत्री पाटील यांनी रविवारी वहीगायन लोककलावंत संमेलनात खानदेशी मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांनी कलावंतांसाठी काय केले? असा प्रश्न खडसेंचे नाव न घेता उपस्थित केला होता. त्यावर खडसेंनी पाटलांवर टीकास्त्र सोडले.
पाटील स्वतःची पाठ थोपटून इतरांवर टीका करत होते. कदाचित त्यांना माहीत नसावं, की त्या सोहळ्यातच त्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले नगरदेवळ्याचे शाहीर शिवाजीराव पाटील यांचे घर काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत कोसळल्याने ते बेघर झाले होते. त्या वेळी रोहिणी खडसेंनी जिल्हाधिकाऱ्यांसह शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा केला.
ते पुढे म्हणाले, मी स्वत: १९९७ मध्ये अर्थमंत्री असताना महाराष्ट्रातील कीर्तनकार व वृद्ध कलावंतांना मासिक मानधन देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोरोनाकाळात कीर्तनकार व वृद्ध कलावंत यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असताना रोहिणीने सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून कोरोनाकाळ संपेपर्यंत त्यांच्या मानधन रकमेत वाढ करण्यासाठी पाठपुरावा केला. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना केवळ भाषणबाजी न करता या कलावंतांना अधिकचे मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, तर बरे होईल, असेही खडसेंनी नमूद केले.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.