छत्रपतींच्या भगव्याचे रक्षण व सुरक्षा फक्त भाजपवरच! : सेनेला फडणविसांचा टोला

नाशिक येथे बोलताना शिवसेनेचे नाव न घेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : काही लोक फक्त भगवा मिरवतात. पाठीमागे कोण कोणासोबत ते काय काय करतात हे पाहता आता भगव्याचे रक्षण आणि तो फडकवत ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर व फक्त भाजपवरच (BJP) आली आहे, अशी टिका शिवसेनेचे नाव न घेता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज येथे केली. नाशिक येथे भाजपच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Devendra Fadanvis
Devendra Fadnavis : नातेवाईकांचा नव्हे, थोडा कार्यकर्त्यांचाही विचार करा!

श्री फडणवीस म्हणाले, आम्ही केलेली कामे पाहता महापालिकेवर भाजपचा भगवा फडकेल याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही. भगवा हा छत्रपतींचा ध्वज आहे. वचनपूर्तीचा ध्वज आहे. तो आता फक्त भाजपचा राहिला आहे. काही लोक भगवा फक्त मिरवतात. पाठीमागे कोणा कोणा बरोबर काय काय करतात हे लपुन राहिलेले नाही. त्यामुळे हा भगवा आपल्यालाच फडकत ठेवावा लागणार आहे.

Devendra Fadanvis
देवेंद्र फडणवीस आज महापालिका निवडणुकीचा बिगुल फुंकणार?

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, मागच्या निवडणुकीत जनतेने आम्हाला भरभरून आशिर्वाद दिले होते. तेव्हा मी म्हणालो होतो, की जनतेने आम्हाला भरभरून आर्शिवाद द्यावेत मी नाशिक शहर दत्तक घेईन. काही लोक दत्तक घेणे याचा अर्थ रोजच महापालिका चालवायची व दलाली खायची असा लावतात. आमच्या दृष्टीने दत्तक घेण्याचा अर्थ तसा नाही. दत्तक घेणे म्हणजे पदाधिकाऱ्यांनी महापालिका चालवावी व जिथे अडचण येईल तीथे त्यांना मदत करणे आणि देशातील सर्व योजनांची अंमलबजावणी करायची, असा आहे.

ते पुढे म्हणाले, नुकतीच जयकुमार रावल आणि आमदार फरांदे यांनी नाशिक शहरात केलेल्या विकासकामांची यादी वाचली. खरे म्हणजे ती अर्धीच वाचली. कारण अर्धी यादी महापौरांच्या खिशात राहिली. मला पुढच्या कार्यक्रमांना जायचे असल्याने महापौरांना भाषणाची संधी मिळाली नाही. अन्यथा ती कितीतरी लांबलचक झाली असती. आम्ही शहरासाठी बससेवा दिली. त्यासोबत मेट्रो द्या, अशी देखील मागणी होती. ज्या योजना साकारणे शक्य होते त्या साकारण्याचा प्रयत्न केला. शहरात मेट्रो सुरु करण्याची आमची इच्छा होती. मात्र त्यापूर्वी दोन वेळा सर्व्हे होऊन नाशिकमध्ये मेट्रो सुरु करणे शक्य नाही असा अहवाल होता. तो फिजीबल नाही असा अहवाल होता. आम्ही जगभरामध्ये किती प्रकारच्या मेट्रो चालतात याचा माहिती घेतली. त्याबाबत सगळा अभ्यास केला. नाशिक शहराचा विस्तार व लोकसंख्येला कोणती मेट्रो सुरु करता येईल, याचा विचार करून मेट्रो प्रकल्प मंजूर केला.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार, माजी मंत्री जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, धुळ्याचे महापौर प्रदिप कर्पे, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार डॅा. राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, विजय साने आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com