Gulabrao Patil & Unmesh Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Farmers Politics: पालकमंत्री गुलाबरावांचा शब्द हवेतच विरला, उन्मेश पाटील विमा कंपनी विरोधात पुन्हा मैदानात उतरले!

Gulabrao Patil's words vanished, deadline for farmer aid was fail, Ex MP Unmesh Patil active again, compensation before Diwali -माजी खासदार उमेश पाटील यांचा गुलाबराव पाटील यांना चिमटा, सत्तेवर आहात, शेतकऱ्यांसाठी तरी गांभिर्याने काम करा....

Sampat Devgire

Unmesh Patil Vs Gulabrao Patil News: जळगावच्या शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाचे राजकारण अद्यापही सुरूच आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मदतीचा मुहूर्त टळला. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे विरोधक सक्रिय झाले आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा झाला. यावेळी कर्जमाफी आणि पीक विम्याची मदत मिळावी यासाठी शिवसेना आक्रमक झाली. त्यामुळे प्रशासन अध्यापही दबावत आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या मोर्चा वरून माजी खासदार उन्मेश पाटील यांना टिक्केचे लक्ष्य केले होते. २८ सप्टेंबरला शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यामुळेच विरोधकांनी मोर्चा काढल्याची टीका केली होती.

त्याला माजी खासदार उन्मेश पाटील यांनी देखील तेवढ्याच तत्परतेने उत्तर दिले होते. भरपाई मिळाल्यास पाळधी येथे जाऊन गुलाबराव पाटील यांचा सत्कार करू. शेतकऱ्यांना मदत मिळाल्यास त्याचे सर्व श्रेय गुलाबराव पाटील यांना देऊ, असे ते म्हणाले.

विमा कंपनीकडून केळी उत्पादकांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. या प्रश्नावर आता माजी खासदार पाटील पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया त्यांनी दोन दिवसापूर्वी सुरू केली.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन विमा कंपनीचे संपर्क साधला आहे. आता महावेध कंपनीकडून नुकसानीचा अहवाल विमा कंपनीला देण्यात आला आहे. कंपनीने हप्त्याची मागणी केल्याने केंद्र शासनाचा वाटा लवकरच मिळेल. त्यामुळे येत्या सहा ऑक्टोबरला लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार आहे.

शिवसेनेचे माजी खासदार पाटील सक्रिय झाल्याने त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या तरतुदीनुसार कारवाई केली. त्यामुळे पाटील यांच्या पुढाकाराचा शेतकऱ्यांना लाभ होणार असून इत्यादीवाळीपूर्वी भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

या निमित्ताने माजी खासदार पाटील यांनी पालकमंत्री पाटील यांना चिमटा घेतला आहे. पालकमंत्री पाटील यांनी माहिती घेऊन आणि अभ्यास करून बोलले पाहिजे. शेतकऱ्यांची अवस्था बिकट असताना सत्तेवर असूनही गुलाबराव पाटील केवळ राजकारण करीत आहेत. मदत मिळावी याबाबत त्यांच्यात गांभीर्य नाही, असे पाटील म्हणाले.

---------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT