Nashik Kumbhmela : आयुक्तांच्या इशाऱ्याने ठेकेदारांचे धाबे दणाणले; कुंभमेळ्याचं काम नीटच करावं लागणार!

Commissioner Praveen Gedam given alert, instructions given to NMC for Kumbhmela development, serious quality control in works-कुंभमेळ्याच्या कामांमध्ये गुणवत्तेला देणार सर्वोच्च प्राधान्य, पहिल्यांदाच होणार कामांचे थेट व्हिडिओ रेकॉर्डिंग.
Pravin Gedam & Manisha Khatri
Pravin Gedam & Manisha KhatriSarkarnama
Published on
Updated on

Simhastha Kumbhmela News: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामानबाबत नियमित आढावा सुरू झाला आहे. महसूल आयुक्त प्रवीण गेडाम या संदर्भात ॲक्टिव्ह मोडवर आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या कंत्राटदारांना तंबी देत निकृष्ठ काम केल्यास थेट जेलची हवा खाण्याचा इशारा दिला आहे.

नाशिक महापालिकेकडून सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात सुमारे १५ हजार कोटींचा आराखडा केला जात आहे. सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत आढावा घेतला. या कामांना निधी उपलब्ध करण्याबाबत विविध पर्यायांचा शोध घेतला जात आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम सक्रिय झाले आहेत. त्यासाठी नियमित बैठकांचे सत्र सुरू आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला कडक सूचना दिल्या.

Pravin Gedam & Manisha Khatri
Nashik BJP Politics: शिक्षण मंत्री दादा भुसेंवर भाजप आमदारांची कुरघोडी; भुसेंनी पोलीस आयुक्तांची भेट घेताच आमदार झाले सक्रीय!

गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रवीण गेडाम महापालिका आयुक्त होते. त्यांनी सिंहस्थाच्या रस्ते तसेच काँक्रिटीकरणासह विकास कामांचे मेरी या संस्थेकडून गुणवत्ता तपासणी केली होती. काम पूर्ण झाल्यावर गुणवत्तेचा अहवाल बंधनकारक करण्यात आला होता.

Pravin Gedam & Manisha Khatri
Nilesh Ghaywal passport case : निलेश घायवळ पळला स्वित्झर्लंडला, पुणे पोलिस तपासाला नगरला; फिल्मसारखचं झालं, पुलिस हमेशा देर से क्यों पहुंचती है, सर!

यंदा महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदारांची बैठक आयुक्त गेडाम यांनी घेतली. कामे गुणवत्तापूर्ण करण्यावर त्यांचा भर होता. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी याबाबत जागरूक राहून काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कुंभमेळ्याची विकास कामे करताना त्याचे तीन वेळा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे. २५ टक्के, ५० टक्के आणि ७५ टक्के काम झाल्यावर त्या त्यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे. यामध्ये कोणतेही निकृष्ठ काम आढळल्यास अधिकाऱ्यांना घरी तर ठेकेदार जेलमध्ये जाणार.

व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या कालावधीतच कामाच्या गुणवत्तेबाबत अभियंत्यांनी तपासणी करावी. कामाचे जिओ टॅगिंग आणि स्टॅम्प साइज फोटो काढावेत. कामाची गुणवत्ता आणि दर्जा अधोरेखित होतील अशी छायाचित्रे काढण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

कुंभमेळ्याच्या संदर्भात आयुक्त गेडाम अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना त्यांनी बारीक सारीक तपशील आणि कार्यशैली याबाबत सूचना केल्या आहेत. ही प्रक्रिया पहिल्यांदाच होत असल्याने कंत्राटदार सावध आहेत. कुंभमेळ्याचे नियोजन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने महसूल आयुक्त गेडाम कोणतीही कमतरता राहू नये यासाठी सक्रिय होऊन काम करीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com