Shivsena leaders organise cycle Rally in City Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अच्छे दिन आले... स्वयंपाक चुलीवर अन् लोक जमिनीवर आले!

इंधन दरवाढीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना नेत्यांनी शहरात सायकल रॅली काढली.

Sampat Devgire

नाशिक : केंद्रातील भाजप सरकार `अच्छे दिन`चे (Dream shown of happy days by BJP) स्वप्न दाखवून सत्तेत आले. लोकांनी त्यांना मते दिली. त्यांनी असे दिवस आणले की, लोकांनी वाहने सोडून सायकल आणि अनेकांना जमिनीवर आनले. देशाच्या इतिहासात असे अच्छे दिन कधी व कोणीच पाहिले नव्हते, अशी टिका शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Shivsena city chief Sudhakar Badgujar) यांनी केली.

'अच्छे दिन'चा नारा देवून सत्तेवर आलेल्या भाजपाप्रणित केंद्र सरकारच्या काळात इंधन आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले. महागाईला प्रोत्साहन मिळाले. सर्वसामान्य जनता त्यात होरपळत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेटच कोलमडले. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसवतांना त्यांना अत्यंत कसरत करावी लागते. याकडे लक्ष वेधण्यासाठी युवासेनेतर्फे आज शहरात सायकल रॅली काढण्यात आली. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, युवासेना संपर्कप्रमुख सिध्देश शिंदे, युवासेना जिल्हाध्यक्ष दीपक दातीर यांनी या रॅलीचे नेतृत्व केले.

शहरातील शालिमार येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथून रॅलीस प्रारंभ झाला. इंधन आणि घरगुती गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे, केंद्र सरकार हाय हाय, जनतेला महागाईच्या खाईत ढकलणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो आदी घोषणांनी परिसर दणाणला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, त्रंबक नाका सिग्नल, गंजमाळ सिग्नल आदी मार्गाने काढण्यात आलेल्या रॅलीचा शिवसेना कार्यालयाजवळ समारोप झाला.

सध्या एक लिटर पेट्रोलसाठी ११५ रुपये तर डीझेलला १०५ रुपये मोजावे लागतात. घरगुती गॅस सिलेंडर एक हजाराच्या घरात गेले आहे. त्याने महागाईचा भडका उडाला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींचे वेतन कमी झाल्याने सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. गॅसची सबसिडी अचानक बंद करुन केंद्राने त्यांच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळण्याचे काम केले आहे. लोकांना आता पुन्हा चुलीवर स्वयंपाक करणे भाग पडत आहे. डिझेल दरवाढीने तर शेतकरी अत्यंत मेटाकुटीला आला आहे. या सर्वांच्या वेदना आणि आक्रोशाकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठीच शिवसेनेतर्फे सायकलरॅली काढण्यात आली. त्यानेही निद्रिस्त केंद्र सरकार जागे न झाल्यास शिवसेनेला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिला.

या रॅलीमध्ये युवासेनेचे गणेश बर्वे, महानगर युवासेना पदाधिकारी रुपेश पालकर, बालम शिरसाट, यश खैरे, सिद्धेश शिंदे, रुपेश पालकर, बालम शिरसाट, समर्थ मुठाळ, शंकर पांगरे, ऋतुराज पांडे, आकाश उगले, महेश मते, कल्पेश पिंगळे, पवन दातीर, रामदास अहिरे, दीपक भोगे, किरण पाटील, गौरव पगारे, पवन मटले, समर्थ मुठाळ, शंकर पांगरे, आकाश उगले, महेश मते, कल्पेश पिंगळे, आदी सहभागी होते

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT