Nashik News, 05 Apr : भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा उलगडा करण्यासाठी एसआयटीने या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची कसून चौकशी सुरू केली आहे. एसआयटीच्या तपासात दररोज अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.
याच तपासा दरम्यान, शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणी अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा संबंध असल्याचं आढळून आलं आहे. परंतू या प्रकरणाच्या चौकशीसाठी कल्पना खरातला एसआयटीने ताब्यात घेण्याआधीच ती फरार झाली. त्यानंतर एसआयटीने खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
या चौकशीत खरातच्या मुलाने घरात खूप कॅश यायची असा धक्कादायक खुसाला त्याने केला होता. मात्र, याबाबत आपणाला सविस्तर काही माहिती नाही, सर्वकाही वडिलांनाच माहिती असल्याचं सांगत त्याने प्रश्नांची उत्तरे देणं टाळलं होतं. अशातच आता अशोक खरातच्या पत्नीनंतर त्याचा मुलगाही फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
कारण हर्षवर्धन सध्या नॉट रीचेबल असून त्याचा मोबाईल बंद आहे. दरम्यान, नुकतंच दोन दिवसांपूर्वी खरातच्या मुलाची एसआयटीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यांनतर त्याला घरी सोडलं होतं. मात्र आता त्याचा फोन नॉट रीचेबल असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय मोबाईल बंद आहे म्हणून त्याच्या निवासस्थानी तपास यंत्रणांनी शोध घेतला असता हर्षवर्धन घरात नसल्याचंही समोर आलं आहे.
त्यामुळे चौकशीचा फेरा टाळण्यासाठी हर्षवर्धन खरात गायब झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, राज्यभरात चर्चेत असलेल्या प्रकरणातील आरोपीचा मुलगा आणि पत्नी सहजरित्या पोलिसांना गुंगारा देत गायब होत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शिवाय चौकशी सुरू असल्यानं खरातच्या मुलाला शहर सोडण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणं अनिवार्य आहे. मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच खरातचा मुलगा कसा गायब झाला असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.