Harshwardhan Sapkal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Congress : हर्षवर्धन सपकाळांचा संघटनात्मक बॉम्ब ! काँग्रेसने नाशिक दोन तुकड्यांत विभागले

Harshvardhan Sapkal divided Nashik Congress : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे संघटनेत काय करू आणि काय नको असे सर्वच राजकीय पक्षांना झाले आहे.

Ganesh Sonawane

Nashik Congress : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यात सर्व पक्षीयांकडून निवडणुकांच्या अनुषंगाने आवश्यक ते संघटनात्मक बदलही केले जात आहेत. कॉंग्रेसनेही नाशिक जिल्ह्यातील आपल्या संघटनात्मक रचनेत निराळा बदल केला आहे.

काँग्रेस पक्षाचे हंगामी अध्यक्ष आणि माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी याआधीच राजीनामा दिलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनात्मक पुनर्रचना करताना आता जिल्ह्याचे एक उत्तर तर एक दक्षिण असे दोन भाग केले आहेत. विशेष म्हणजे कॉंग्रेसने भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धर्तीवर ही रचना केल्याने राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा सुरु आहे.

परंतु दोन्ही विभागाच्या अध्यक्ष ठरवण्याच्या प्रक्रियेत अद्याप कॉंग्रेसला एकाच नावावर शिक्कामोर्तब करण्यात यश आलं आहे. यात उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी रमेश कहांडोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक उत्तर जिल्हाध्यक्षपदी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते रमेश कहांडोळे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

तर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षाच्या नियुक्तीची प्रतीक्षा कायम असून त्यासाठी सध्या जोरदार लॉबिंग सुरू आहे. माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, ज्ञानेश्वर गायकवाड, भरत टाकेकर यांची नावे सध्या चर्चेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणचेही नाव ठरवले गेले होते पण स्थानिक पातळीवर विरोध झाल्याने नावावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. त्यामुळे दक्षिणच्या जिल्हाध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून आहे.

उत्तर जिल्हाअंतर्गत सुरगाणा, कळवण, पेठ, दिंडोरी, सटाणा, देवळा, मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या अध्यक्षपदी रमेश कहांडोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दक्षिण जिल्हाअंतर्गत नाशिक तालुका,त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, निफाड, चांदवड आणि येवला या तालुक्यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT