Harshvardhan Sapkal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal Politics: काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे आता थेट अमित शहांना चॅलेंज; ‘... तेव्हाच तुम्ही रायगडावर पाऊल ठेवा’

Harshvardhan Sapkal; Congress state president reports directly to Amit Shah, said...-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रायगड किल्ल्याचा दौरा हा भाजपच्या बेगडी राजकारणाचा भाग

Sampat Devgire

Harshvardhan Sapkal News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि त्यांच्या मातृसंस्थांच्या विचारसरणीचा कडक शब्दांत समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या अवमानाच्या विषयावरून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील त्यांनी थेट आव्हान दिले.

काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी आज नाशिकच्या कार्यकर्त्यांना चांगलेच चार्ज केले. यावेळी त्यांनी श्रीराम मंदिरासह भाजप आणि भाजप, संघाच्या संघटनांच्या प्रचाराला थेट उत्तर दिले. भाजप आणि त्यांच्या संस्था प्रभू श्रीरामचंद्रांचे नाव फक्त राजकारण म्हणून घेत आहे. राज्यातील आणि देशातील सर्वसामान्य व्यक्ती जन्माला आल्यापासून रामाचा भक्त आहे. त्यामुळे श्रीरामाबाबत भाजपला हा सामान्य माणूसच एक दिवस सत्तेतून बाहेर फेकेल, असे ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या १२ एप्रिलला रायगड किल्ल्यावर येत आहेत. यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतील. त्यांच्या या दौऱ्याला सपकाळ यांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. मुळ विषयांवरून सामान्यांचे लक्ष हटविण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कठोर शिक्षा होईल अशी तजवीज करावी. राहुल सोलापूरकर याला अटक करावी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी यांच्या "बंच ऑफ थॉट्स" या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. या पुस्तकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतरच रायगड किल्ल्यावर यावे.

श्री सपकाळ यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, भगवान गौतम बुद्ध यांनी वेगळा धर्म स्थापन केला. महावीरांनी वेगळे तत्त्वज्ञान मांडले. संत बसवेश्वरांनी वेगळ्या धर्म सांगितला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचा वारकरी पंथ निघाला. या संतांना कोणत्या विचारसरणीने त्रास दिला. त्यावेळी तो कोणाच्या विरोधात आणि कोणापासून वेगळा निघाला. तेव्हा औरंगजेब होता का?. संघ, भाजप ज्याचे प्रतिनिधित्व करतात तीच सडकी धार्मिक प्रवृत्ती या सगळ्यांना त्रास देत होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे औरंगजेब नव्हते. त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे हेच संघ आणि भाजपच्या विचारसरणीचे लोक होते. या सगळ्यांना बहुजन समाजाने नाकारले आहे. म्हणूनच ते खोटे आणि दिशाभूल करणारे दावे करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

महाराष्ट्रात २८८ पैकी २३९ आमदार सत्ताधारी महायुतीचे आहेत. केंद्रातील सरकारही त्यांचेच आहे. मग शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेचे वाढीव मानधन, शेतमालाला भाव, युवकांना नोकऱ्या का मिळत नाही,?. यांनी केंद्राकडे जाऊन निधी आणावा. मात्र ते औरंगजेब सारखा विषय घेऊन दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत.

सत्ताधारी महायुतीच्या भाजप व त्यांच्या विचाराच्या नेत्यांपासून प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे. सर्व लोक जनतेची फसवणूक करीत आहेत. जनतेच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी वाद विवादाचे राजकारण करीत आहे. काँग्रेस पक्ष हे सर्व राजकारण उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT