उत्तर महाराष्ट्र

Hemant Godse Viral Video : शिंदे गटाच्या खासदाराचा वादग्रस्त व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल!

Congress viral controversal video of MP : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने खळबळ उडाली आहे.

Sampat Devgire

Loksabha Election Politics: शिवसेनेच्या शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या विषयीचा एक वादग्रस्त व्हिडिओ काँग्रेसने व्हायरल केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओमुळे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. Congress viral controversal video of MP

राज्यातील सत्ताधारी गटाच्या नेत्यांवर विविध आरोप होत आहेत. विरोधकांकडून या नेत्यांना लक्ष केले जात आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नाशिकच्या खासदारांची ही भर पडली आहे.

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये हुक्का पार्लर मधील एका महिलेसोबत संबंधित खासदार दिसत आहेत. त्यात संबंधितांचे वर्तन आक्षेपार्ह दिसत आहे. त्यावर फोटो ट्विट करणारे तिवारी यांनी 'हीच का या खासदारांची संस्कृती' असे प्रश्नार्थक वाक्य लिहिले आहे. Hemant Godse viral Video

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमधील आणि नेत्यांमधील राजकीय संघर्ष टोकाला जात असल्याचे चित्र आहे. यातूनच समाज माध्यमांवर असे व्हिडिओ आणि वक्तव्य जोरकसपणे राजकारणात तेल ओतण्याचे काम करू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा एक व्हिडिओ आणि फोटो नुकताच प्रकाशित झाल्याने त्यावरून राज्याच्या राजकारणात वादळ उठले होते शिंदे गटाच्याच एक नेत्यांचा व्हिडिओ देखील चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला होता. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या खासदारांचा हा व्हिडिओ ट्विट करण्यामागे राजकारण तर नाही ना अशी देखील चर्चा आहे. या व्हिडिओवर नेटकरांनी खासदार गोडसे यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

दरम्यान, याबाबत गोडसे यांच्याशी संपर्क केला असता, 'आपला त्या व्हिडिओशी काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ मोर्फ केला आहे. त्यामुळे या संदर्भात काल रात्रीच शहराच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. सत्य नक्कीच बाहेर येईल.'

Edited By : Rashmi Mane

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT