Nashik : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नगर येथील सभेतील वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यावर भुजबळ यांनी 'माझ्या वक्तव्याचा विपर्यास करू नका' असे म्हटले आहे. नगर येथे झालेल्या ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार मेळाव्यात नाभिक समाजाबद्दल केलेलं वक्तव्य हे एका बांधवाने त्याच्या गावातील केलेल्या तक्रारीमुळे केले आहे. ते वक्तव्य केवळ त्या गावापुरतेच मर्यादित आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे. (Maratha Reservation)
मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या टीका होत आहे. त्यावर खुलासा करताना ते म्हणाले, एका गावातील नाभिक समाजाच्या कार्यकर्त्याने ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) समर्थनार्थ पोस्ट केली. त्या नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या दुकानात केस कापायला जायचं नाही, अशी तिथल्या मराठा समाजाने भूमिका घेतली होती. अशी बहिष्काराची भाषा जर कोणी करत असेल, तर नाभिक बांधवांनी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, असे नगर येथील सभेत आपण आवाहन केले होते.
सभेत केलेलं हे वक्तव्य पूर्णतः त्या गावापुरते मर्यादित आहे. मात्र समाज माध्यमांवर या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. ही अतिशय चुकीची बाब आहे. अर्धवट क्लिप व्हायरल करून काही समाजकंटक हे नाभिक बांधवांमध्ये गैरसमज निर्माण करत असल्याने नाभिक बांधवांनी सुद्धा ते लक्षात घ्यावं, असेही त्यांनी म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण नको, यावर ठाम असलेले छगन भुजबळ मराठा समाजाच्या रडारवर आहे. जामिनावर असलेले भुजबळ धडधाकट असून रोज समाजात विद्वेष पसरविण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांचा जामीन का रद्द केला जात नाही, असा प्रश्न सकल मराठा समाजाने केला आहे.
समाजामध्ये द्वेष पसरविणे आणि अशांतता निर्माण करण्यासाठी चिथावणी देणे, यासाठी भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना समज देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. यासंदर्भात सकल मराठा समाजाचे समन्वयक व निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत बनकर, करण गायकर, नानासाहेब बच्छाव, योगेश नाटकर, अनिल आहेर, भाऊसाहेब निकम, विजय देवरे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी पंचवटी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक मधुकर कड यांना लिखित निवेदन दिले आहे.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.