Hemant Godse, Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik constituency 2024: गोडसेंच्या उमेदवारीसाठी शिंदेंची आमदारांना फोनाफोनी

Eknath Shinde : नाशिकच्या जागेवरील भारतीय जनता पक्षाचा दावा मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे Shivsena खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांची भेट घेतली.

Sampat Devgire

Hemant Godse News : महायुतीकडून नाशिकचा अपवाद वगळता राज्यातील सर्व लोकसभा उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. नाशिकची उमेदवारी आज दुपारपर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार कोण? हे ठरविण्यासाठी कालपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी होत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काल भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांची चर्चा केली होती. यावेळी बावनकुळे यांनी नाशिकच्या जागेवरील भारतीय जनता पक्षाचा दावा मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे Shivsena खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांची भेट घेतली.

नाशिकला हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी केव्हाही जाहीर होऊ शकते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्याची सर्व तयारी गोडसे समर्थकांनी केली आहे. ही उमेदवारी जाहीर करताना महायुतीच्या Mahayuti सर्व घटक पक्ष आणि स्थानिक आमदार यांना विश्वासात घेण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व पाच आमदारांना फोन केला. खासदारांची गोडसे यांच्या उमेदवारीबाबत नाराजी होती. याविषयी संबंधित पक्ष नेत्यांना यातील आमदारांनी कळविले होते. त्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे आणि देवयानी फरांदे यांच्याशी संपर्क साधला. अजित पवार गटाच्या सरोज अहिरे आणि माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनाही मुख्यमंत्री यांनी संपर्क केला. निवडणुका अंतिम टप्प्यात आहे. वेळ अतिशय कमी आहे. त्यामुळे आज आम्ही उमेदवार जाहीर करणार आहोत. त्याबाबत आपण उमेदवाराला सहकार्य करावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

राज्यातील महायुतीच्या पाच मतदारसंघांबाबत वाद होता. यामध्ये दक्षिण मुंबई, पालघर, उत्तर मध्य मुंबई, ठाणे आणि नाशिक या मतदारसंघांचा Constituency समावेश आहे. हे सर्व मतदार संघ पूर्वाश्रमीच्या शिवसेनेचे आहेत. या मतदारसंघावर शिवसेनेचे शिंदे ShivsenaShinde गटाने दावा केला होता. काल याबाबत दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव Yamini Jadhav यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज ठाण्यातून नरेश म्हस्के Naresh Maske आणि कल्याण मधून डॉ श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांचे नाव जाहीर झाले आहे. नाशिकची उमेदवारी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. विद्यमान खासदार हेमंत गोडसे Hemant Godse त्यासाठी प्रबळ दावेदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT