Hemlata patil eknath shinde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hemlata Patil Resign: एकनाथ शिंदेंना दीड महिन्यांतच नाशिकमध्ये मोठा धक्का; हेमलता पाटलांचा शिवसेनेचा तडकाफडकी राजीनामा

Nashik Politics : काँग्रेसमधून दीड महिन्यांपूर्वीच प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देत शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेल्या नाशिकच्या हेमलता पाटील यांनी तडकाफडकी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे.

Deepak Kulkarni

Nashik News: महायुती सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधीवाटपात शिवसेनेच्या मंत्री व आमदारांना डावललं जात असल्याची तक्रारही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केल्याचंही बोललं जात होतं. पण याचदरम्यान, मुंबई, पुणे, ठाणे, कोकणासह राज्यात विविध ठिकाणी उद्धव ठाकरेंना धक्का देणाऱ्या एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) आता नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसमधून दीड महिन्यांपूर्वीच प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देत शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या नाशिकच्या हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी तडकाफडकी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे.यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा एकनाथ शिंदेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसवर गंभीर आरोप करत शिवसेनेत दाखल झालेल्या हेमलता पाटील या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पण त्या थेट राजीनामा देतील अशी शक्यता नव्हती. पण आता पाटील यांनी शिवसेनेत आपण कामाला न्याय देऊ शकत नसल्यानं राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेमलता पाटील यांनी सध्यातरी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. संघटनात्मक पातळीवर काम करताना अडचणी येत असल्यानं कार्यकर्त्यांची मोठी कोंडी होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच हेमलता पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केल्याची नाशिकच्या राजकारणातली चर्चा जोर धरू लागली आहे.

शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर हेमलता पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातून त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. त्या व्हिडिओत म्हणाल्या,मी गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी इच्छुक असताना मला उमेदवारी मिळाली नाही.म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असल्याचीही भूमिका त्यांनी मांडली आहे.

हेमलता पाटील पुढे म्हणाल्या,पण मला शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर गेल्या दीड महिन्यांत आपण या पक्षाला आणि पक्षामध्ये काम करताना योग्य तो न्याय देऊ शकत नाही. मी योग्य ते काम करू शकत नाही,अशी माझी स्वतःची प्रामाणिक भावना झाली. त्या भावनेला साक्षी ठेवून मी यानंतर या पक्षात काम करायचा नसल्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी त्यांनी आपण एखाद्या पक्षात प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. त्या पक्षाला योग्य तो न्याय दिला पाहिजे. परंतु, तसा न्याय मी देऊ शकत नाही. त्यामुळे सध्या मी कुठल्याही पक्षात काम न करण्याचे ठरवलं असल्याचंही पाटील यांनी त्यांच्या व्हिडिओत म्हटलं आहे. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT