Pune Crime News: धक्कादायक! 25 रुपयांच्या बंदुकीनं 25 ते 30 तोळे सोनं लुटलं; पुण्यात सराफ दुकानावर दरोडा

Pune Crime : पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून ऐरणी वरती आला आहे. अशातच पुण्यामध्ये दिवसाढवळ्या लुटीचा प्रकार घडल्याने सिंहगड रोड परिसरात भीतीचं वातावरण आहे.
Pune Robberry Crime
Pune Robberry Crime Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरामध्ये दिवसाढवळ्या बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्रकार घडला आहे. तीन अनोळखी व्यक्तींनी दुकानात घुसून मालकाला मारहाण करत हा दरोडाचा प्रकार केल्याचा समोर आला आहे.

सिंहगड परिसरातील धायरी येथील मंगळवारी (ता.15) दुपारी तीनच्या सुमारास सिंहगड परिसरातील धायरी (Dhayari) येथील एका सराफाच्या दुकानात तीन दरोडेखोर ग्राहक असल्याचा भासवत दुकानांत घुसले त्यानंतर त्यातील एकाने बंदुकीचा धाक दाखवत सराफाकडून सोन्याची मागणी केली विरोध केला असता सराफाला आणि त्याच्या कामगारांना त्या दरोडेखोरांनी मारहाण केली. त्यानंतर सोन्याची लूट करत टू व्हीलर च्या साह्याने या दरोडेखोरांनी पळ काढला.

पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून ऐरणी वरती आला आहे. अशातच पुण्यामध्ये दिवसाढवळ्या लुटीचा प्रकार घडल्याने सिंहगड रोड परिसरात भीतीचं वातावरण आहे.

Pune Robberry Crime
Fadnavis Government: फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ...तर 'त्या' कैद्यांच्या कुटुंबियांना मिळणार मोठी आर्थिक मदत!

गेल्या काही दिवसांपासून चोरी, मारहाण आणि खुनच्या घटना सातत्याने पुणे शहर आणि परिसरात घडताना पाहायला मिळत आहे. अशातच दिवसात ढवळ्या अतिशय गजबजलेल्या परिसरामध्ये अशाप्रकारे दरोडा पडल्याने पुन्हा एकदा पोलिसांचा या चोरट्यांना धाक राहिलाय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

याबाबत पुणे पोलिसांकडून (Pune Police) मिळालेल्या माहितीनुसार, काळुबाई चौक , रायकर मळा , धायरी येथील श्री सराफ दुकानात दुकान मालक विष्णू सखाराम दहिवाल आणि कामगार दुकानात असताना एक व्यक्ती दुकानात आला . सोन्याची चैन दाखवा , असे सांगून मालक सोन्याची चैन दाखवत असताना आणखी दोन अनोळखी व्यक्ती एकापाठोपाठ दुकानात शिरले.

Pune Robberry Crime
Hasan Mushrif Crisis : हसन मुश्रीफांसमोर 'दुहेरी' संकट, मात्र आतापासून...!

त्यांनी पिस्तुल दाखवून आणि धमकी देऊन शिवीगाळी करत अंदाजे 25 ते 30 तोळे सोन्याचे वेगवेगळे दागिने हिसकावले. दरम्यान, दुकान मालकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना हाताने मारहाण करून, पिस्टलचे बट ने मारहाण करून दुचाकीवरून फरार झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेत वापरलेली बंदुक ही खेळण्यातली असल्याचे समोर येत आहे.

प्लास्टिकच्या पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा !

पुण्यातील धायरी भागातील श्री ज्वेलर्स वर तीन दरोडेखोरांनी काही वेळापुर्वी दरोडा टाकला. विष्णू दहीवाळ यांच्या मालकीचे हे दुकान आहे. दरोडोखोरांनी त्यांच्याकडील पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील २० ते २५ तोळे सोने लुटुन नेले. मात्र, त्यासाठी वापरलेले पिस्तुल हे खेळण्यातील असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पळून गेलेल्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com