Eknath Khadse Statement on Hijab Controversy
Eknath Khadse Statement on Hijab Controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

हिजाब हा मुस्लिम समाजाचा अधिकार!

Sampat Devgire

भुसावळ : कर्नाटक सरकारने महाविद्यालयात हिजाब (Hijab) घालण्यास बंदी घातली आहे. मात्र, यामुळे धार्मिक तेढ वाढण्याची भिती आहे. हिजाब हा मुस्लिम महिलांचा (Womens) अधिकार असल्याचे मत माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केले.

शहरातील आरपीडी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बुधवारपासून स्व. निखील खडसे स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेला टॉस करून प्रारंभ झाला. अनिकेत पाटील व मित्र परीवारातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे बोलत होते.

या संदर्भात श्री खडसे म्हणाले, कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. राज्या-राज्यात आणि दोन समाजात या निर्णयामुळे विद्वेष पसरण्याची भीती आहे. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने यावर सांगितले की भावनेच्या आधारावर कुठलाही निर्णय न घेता राज्य घटनेला अनुसरून निर्णय दिला जाईल. मात्र, न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच यामुळे समाजात असंतोष पसरत आहे. कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा असून, यामुळे समाजात विद्वेष पसरत आहे.

यावेळी खासदार रक्षा खडसे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश नेमाडे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, माजी नगरसेवक प्रा. सुनील नेवे, आयोजक अनिकेत पाटील, अ‍ॅड. बोधराज चौधरी, सुनील महाजन, देवा वाणी, दिनेश नेमाडे आदी उपस्थित होते.

ही स्पर्धा १२ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, रविवारी भारतीय संघाचे माजी कप्तान मो. अझरूद्दीन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, प्रत्येक दिवशी प्रत्येकी सहा षटकाच्या सात मॅचेस होतील. रविवारी सकाळी दहाला उपांत्य व त्यानंतर अंतीम सामना होईल. हा सामना आठ षटकांचा असेल. त्यानंतर दुपारी तीनला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT