काँग्रेस नेते म्हणतात, शर्म करो, मोदीजी शर्म करो!

येवला येथे विंचूर चौफुलीवर काँग्रेसतर्फे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
Congress Workers agitaion at Yeola
Congress Workers agitaion at YeolaSarkarnama
Published on
Updated on

येवला : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यानी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचा येथील काँग्रेसतर्फे (Congress) आज शर्म करो मोदी..असे अनोखे आंदोलन करून निषेध करण्यात आला. पंतप्रधान यांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे. त्यातून त्यांचा महाराष्ट्राविषयीचा द्वेष प्रकट होतो, अशी टिका करण्यात आली.

Congress Workers agitaion at Yeola
महिलांचा अपमान करायचा आणि माफी मागायची, हे समर्थनीय नाही!

याबबात कॉंग्रेसने स्वतंत्र निवेदन प्रसिध्द करीत मोंदींवर कडाडून टीका केली. मोदी पंतप्रधान म्हणून कमी आणि पक्षीय अभिनिवेश म्हणून जास्त वागत आहेत. देशाच्या सर्वोच्च्य संवैधानिक ठिकाणी त्यांनी केलेले हे भाषण संसदीय चौकटींची मर्यादा ओलांडणारे आहे. विरोधी पक्ष म्हणून विरोध जरूर करा, पण सत्ताधारी पक्षाला अशी खालच्या पातलीवरूल टीका न शोभणारी आहे. त्यांच्या या टिकेने त्या पदाचाच नव्हहेतर समस्त महाराष्ट्रवासियांचा घोर अपमान केला आहे. पंतप्रधान मोदींनी भाषणात महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचा आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. काँग्रेसवरही खोटे-नाटे आरोप केले आहे. त्यामुळे निषेध करण्यासाठी तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे विंचूर चौफुली येथे शर्म करो मोदी हे अंदोलन करण्यात आले. नरेंद्र मोदी हाय हाय, खोटे बोलणा-या मोदींचा धिक्कार असो, महाराष्ट्राचा अपमान करणा-या मोदींचा धिक्कार असो यासह मोदी यांच्या भाषणाचा निषेध करणा-या विविध घोषणा देण्यात आल्या.

Congress Workers agitaion at Yeola
दानवेंच्या प्रयत्नांना यश; जालना-जळगांव रेल्वे मार्गाच्या सर्वेला मंजुरी

घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महाराष्ट्राने कुठलाही भेदभाव न पाळता कोरोना काळात सर्वांची काळजी घेतली. इतर राज्यातील मजुरांना सुखरूप वाचवण्यासाठी पुढाकार घेतला असे असताना अपमानास्पद बोलणे गैर असून या वक्तव्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी या वेळी तालुकाध्यक्ष समीर देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली.

या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com