Himgauri Aher - Adke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Mayor Politics: नाशिक महापालिकेत आता भाजपचीच सत्ता! गिरीश महाजनांकडून नावांची घोषणा; 25 वर्षांनी महापौर पदासाठी 'मराठा' कार्ड!

Nashik Mayor politics latest news : २५ वर्षांनंतर नाशिक महापालिकेतील महापौर पदासाठी भाजपने मराठा कार्ड वापरल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Sampat Devgire

Nashik Mayor BJP News: नाशिक महापौर पदासाठी भाजपने हिमगौरी अडके यांचे नाव निश्चित केले. त्या भाजपच्या पहिल्या महिला महापौर होणार. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय झाला. नाशिक महापौर पदाची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. भाजपने महापौर पदासाठी हिमगौरी आडके यांचे नाव निश्चित केले. उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची घोषणा झाली आहे.

यंदाचे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. त्यासाठी श्रीमती आडके, दिपाली गीते आणि दिपाली कुलकर्णी ही नावे चर्चेत होते. मात्र सर्वाधिक अनुभवी आणि निष्ठावंत हा निकष आडके यांच्या पथ्यावर पडला आहे. भाजपची सत्ता असताना यापूर्वी खुल्या प्रवर्गातील महापौर पदासाठी सतीश कुलकर्णी यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा दिपाली कुलकर्णी यांचे नाव आपोआप मागे पडले. यासंदर्भात नगरसेवकांमध्येच आडके यांच्या विषयी अनुकूलता निर्माण झाली होती.

दिपाली गीते या पहिल्यांदाच निवडून आल्या होत्या. त्यांचे पती गणेश गीते स्थायी समितीचे माजी सभापती आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजप विरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांच्या नावाला पक्षातील निष्ठावंत नगरसेवकांचा प्रखर विरोध होता. महापौर पदासाठी संधी मिळालेल्या आडके या अनुभवी आणि पक्षाच्या निष्ठावंत मांडल्या जातात. माझी आरोग्य मंत्री डॉ डी एस आहेर यांच्या कुटुंबीयांचील आहेत. त्यांच्या मातोश्री या देखील माजी उपमहापौर होत्या. वडील बाळासाहेब आहेर भाजपचे स्थायी समितीचे माजी सभापती आहे.

हिमगौरी आडके यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चांगल्या संपर्क आहे. आमदार डॉ राहुल आहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपले वजन वापरले. मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा दुहेरी कार्ड मुळे श्रीमती आडके यांचे नाव अंतिम होण्यासाठी राजकीय प्रयत्न फळाला आले.

यापूर्वी शिवसेनेचे दशरथ पाटील हे 2002 मध्ये शिवसेनेचे महापौर झाले होते. त्यानंतर नाशिकला ओबीसी आणि अन्य समाजाला महापौर पदासाठी संधी मिळाली. मात्र महापौर पदासाठी मराठा समाजाला खुल्या प्रवर्गातूनही संधी मिळाली नव्हती. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उच्चविद्याविभूषित म्हणून श्रीमती अडके यांचे नाव निश्चित होताना हा निकष महत्त्वाचा ठरला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT