उत्तर महाराष्ट्र

Hiraman Khoskar : एकनाथ शिंदेंना भेटलो तेव्हा मला शिव्या दिल्या; व्हायरल क्लिपवर आमदार खोसकरांनी आरोप फेटाळले, मुलाची बाजू घेतली...

Vaman Khoskar, Hiraman Khoskar news : शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भोये यांनी केलेले आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी फेटाळले. म्हणाले, भोयेंनी मला व मुलाला दोघांना शिव्या दिल्या होत्या.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर-इगतपुरी विधानसभा मतदार संघात सध्या महायुतीतील सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षाच्या नेत्यातच कलगीतुरा रंगला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे इगतपुरी -त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर यांच्यावर शिवसेनेचे त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख रविंद्र भोये यांनी गंभीर आरोप केले आहेत. वामन खोसकर यांनी आपल्याला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भोये यांनी केला आहे. भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांत वामन खोसकर यांच्याविरोधात तक्रार देखील केली आहे.

खोसकर यांचा मुलगा वामन खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भोये यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची एक कथित ऑडियो क्लीपही व्हायरल झाली आहे. बैठका घेण्याचे अधिकार हे आमदारांना असतात. पंरतु प्रत्यक्षात आमदार पुत्र वामन खोसकर हे बैठका घेऊन ग्रामसेवकांना धमकी देतात असा आरोप भोये यांनी केला आहे. मात्र, आमदार हिरामण खोसकर यांनी मात्र, हे सर्व आरोप फेटाळले असून त्यांनी आपल्या मुलाची बाजू घेतली आहे. एका खासगी वृत्त वाहिनीशी या विषयावर बोलताना त्यांनी खुलासा केला.

खोसकर म्हणाले, केंद्राचा काही निधी आणायचा आहे. त्यासाठी मी स्वत: दोन्ही तालुक्यांच्या ग्रामसेवकांची वेगवेगळी मीटिंग घेतली. या मीटिंगला माझा मुलगाही होता. मात्र, ग्रामसेवकांना आपणच काय त्या सूचना दिल्या. माझ्या मुलाचा त्यात काही रोल नव्हता. मीटींग झाल्यानंतर मी निघून आलो, त्यामुळे त्यानंतर काय झालं मला माहित नाही.

याउलट भोये यांनी माझ्या मुलाला लोकसभेच्या वेळी अत्यंत खालच्या भाषेत शिव्या दिल्या होत्या. माझा मुलाने मीटिंग घेतल्याचा त्यांचा आरोप चुकीचा आहे. मीच मीटिंग घेतली. अधिकाऱ्यांना विचारा, तो शंभर टक्के खोटारडा आहे, खोटं बोलूनच तो इथवर आलाय असा टोला खोसकर यांनी भोये यांना नाव न घेता लगावला.

आम्ही त्यांचे नाव घेतले नाही. नाव घेण्याइतके ते काही मोठे पदाधिकारी नाही. आम्ही केवळ अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घेतली. मीटिंगला माझ्यासोबत मुलगा आला असेल तर काय फरक पडतो. तो फक्त शेजारी बसला होता. मीटिंग पूर्णपणे मी घेतली. माझा पीए देखील होता असं खोसकरांनी स्पष्ट केलं.

भोये यांनी लोकसभेच्या वेळी माझ्या मुलाला आई-बहिणीवरुन घाणघाण शिव्या दिल्या. तरीही आम्ही त्यांना दुखावलं नाही. माझ्या मुलालाही मी आवरलं. एवढचं काय तर मी एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा भोये यांनी मला त्यावरुन शिव्या दिल्या होत्या. माझ्याकडे रेकॉर्ड आहे. आताही भोये बिनबुडाचे आरोप करत असल्याचं खोसकर म्हणाले. महायुतीत वाद होईल असं आम्हाला काही करायचं नाही असं खोसकरांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT