Shivsena Agitation at Chalisgaon
Shivsena Agitation at Chalisgaon  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजप खासदार उन्मेष पाटील यांना शिवसेनेचे खुले आव्हान

Sampat Devgire

पाचोरा : विकासाच्या नावे ढोल न वाजवता भाजपचे (BJP) खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी बांधलेले एक स्वच्छतागृह जरी दाखवले तर एक लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याचे खुले आव्हान मुकुंद बिल्दीकर यांनी शिवसेनेच्या (Shivsena) आंदोलनप्रसंगी दिले.

यावेळी ते म्हणाले, आमदार किशोर पाटील यांनी आपल्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांची सर्वांगीण विकासाची कामे आतापर्यंत केली आहेत. त्यांची कामे पाहता येत नसतील तर भाजपवाल्यांनी आमच्याकडून चष्मे न्यावेत. शेतकऱ्यांचा पैसा व जमिनी हडप करणाऱ्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये.

यावेळी ते म्हणाले, बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना आता शिवसेना स्टाईलने उत्तरे दिले जातील. आमदारांकडून कामे मंजूर करून घेऊन त्या कामांचा टेंभा मिरवणाऱ्या व शिक्षकांकडून पैसे घेऊन वृक्षारोपणाचे श्रेय लाटणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांना आमदारांविरोधी बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे काय? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, अमोल पाटील, मधुकर काटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नासंदर्भात मंगळवारी ‘ढोल बजाओ’ आंदोलन केले. भाजपने केलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी बुधवारी दुपारी शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपविरोधी आंदोलन केले.

याप्रसंगी मुकुंद बिल्दिकर, युवा नेते सुमीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, दीपकसिंग राजपूत, संजय पाटील (भुरा आप्पा), तालुकाप्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT