Sanjay Raut News : सरकारमधील सत्ताधारी सगळेच डरपोक आहेत. हे सगळे मिंधे झाले आहेत. त्यामुळे त्यांना समाजाचे प्रश्न दिसत नाहीत. त्यामुळे ते ड्रग्जसारख्या विषयावर दिशाभूल करीत आहेत. अमली पदार्थांच्या व्यापारातून सहा आमदारांना हफ्ते जात होते. त्यांची नावे लवकरच बाहेर येतील, असा आरोप संजय राऊत यांनी केला. (All those who are in Government are being selfish)
शिवसेनेने (Shivsena) आज काढलेला मोर्चा राजकीय नसून सामाजिक कारणासाठी काढलेला आहे. भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) या युवकांचा प्रश्न समजून घेऊन ‘ड्रग्ज’ची पाळेमुळे मोडून काढावा, असे आव्हान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले.
शिवसेनेने आज ‘ड्रग्ज’ विरोधात प्रचंड मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले. या मोर्चात राज्यातील सत्ताधारी आणि पालकमंत्री दादा भुसे यांना टार्गेट करण्यात आले. या वेळी खासदार राऊत यांनी मोर्चाविषयी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे. येथे गल्ली गल्लीत पान टपरीवर ड्रग्ज पोहोचले असेल, तर आम्हाला आवाज उठवावाच लागेल. त्यासाठी हा मोर्चा आहे.
ते म्हणाले, या मोर्चाकडे देशाचे लक्ष लागले आहे. आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, त्याचे उत्तर न देता सत्ताधारी व भाजपने त्यावर चिखलफेक सुरू केली आहे. राजकीय लोकांशिवाय हा नशेचा बाजार सुरू राहू शकतो का?. असा प्रश्न त्यांनी केला.
ते म्हमाले, ‘ड्रग्ज’ प्रकरणात काल जे लोक पकडले, ते केवळ मोहरे आहेत. त्यांचे संबंध मालेगावपर्यंत आहेत. हा विषय आंतरराष्ट्रीय आहे. त्यातून पोलिसांसह अनेकांना हप्ते जात आहेत. अगदी नांदगावपर्यंत धागेदोरे आहेत. ‘ड्रग्ज’ तस्कर ललित पाटील याचा मित्र आणि परिवार विधानसभेपर्यंत आहेत. या रॅकेटमध्ये आमदार, मंत्री आणि पोलिसदेखील आहेत, असा आरोप त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.