Eknath Khadse & Gulabrao Patil
Eknath Khadse & Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

खडसेंनी विचारले, अशा डाकू आमदाराला तीस वर्षे निवडून कसे दिले?

Sampat Devgire

वरणगाव : मला जर शिवसेनेचे (Shivsena) पालकमंत्री डाकू म्हणत असतील, मुक्ताईनगर (Muktainagar) मतदारसंघातील मतदारांनी तीस वर्षे मला निवडून कसे दिले, असा खोचक सवाल माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी लगावला.

वरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सोमवारी (ता. २१) सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा परिसंवाद मेळावा झाला. त्या वेळी श्री. खडसे बोलत होते.

खडसे म्हणाले, की बोदवड नगर परिषद निवडणुकीत छुपी युती झाली होती. परिसरातील कोट्यवधींची विकासकामे माझ्या कारकीर्दीत झालेली असून, अनेक लोक त्याचे उद्‌घाटन करीत आहेत. गुलाबराव पाटलांच्या नावाची सुरवातच कशी आहे, हे आपणास चांगले ठाऊक आहे. जर मला शिवसेनेचे नेते डाकू म्हणत असतील तर एखाद्या डाकूला तीस वर्षे निवडून कसे दिले, असा खोचक सवालही त्यांनी पालकमंत्री पाटील यांना केला.

पालिकेत सत्ता मिळवायची असेल, तर जोमाने काम करावे लागेल आणि जे लोक चुगलखोरी करतात, त्यांना आधी बाहेर काढा, असे त्यांनी जिल्हाध्यक्षांना सांगितले. विविध शाखा व पदाधिकाऱ्यांना या वेळी नेमणूकपत्र देण्यात आले. तसेच, अनेक युवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. समाधान चौधरी यांनी प्रास्ताविक केले. वाय. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. महेश सोनवणे यांनी आभार मानले.

यावेळी माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभय्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, बरकत अली, भरत पाटील, सतीश घुले, प्रा. जतीन मेढे, उमेश नेमाडे, राजेंद्र चौधरी, सुधाकर जावळे, विष्णू खोले, बबलू माळी, रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, समाधान चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, साजीद कुरेशी, माजी नगराध्यक्षा अरुणाताई इंगळे, प्रतिभा तावडे, रंजना पाटील, रोहिणी जावळे, महेबूब पठाण, मझर पठाण आदी व्यासपीठावर होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT