भाजप नगरसेविकेचे ‘कामचुकार’ पती २५ वर्षे फुकट पगार घेत आहेत!

शिवसेना नगरसेवक बंटी जोशी यांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीत कारवाईची मागणी केली.
Jalgaon Corporation
Jalgaon CorporationSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांचे पती किरण बेंडाळे महापालिकेत (Jalgaon) शिपाई पदावर कार्यरत आहेत. मात्र ते काम न करता गेली पंचवीस वर्षे फुकटात पगार घेतात. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे (Shivsena) नगरसेवक बंटी ऊर्फ अनंत जोशी यानी पत्रकार परिषदेत केली आहे.

Jalgaon Corporation
महापालिका निवडणुकीतही भाजप धरणार हिंदुत्वाची कास!

शिवसेना नगरसेवक जोशी यांनी महापालिकेत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, त्या वेळी ते म्हणाले, की महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांचे पती किरण बेंडाळे हे महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत आहेत. मात्र ते कोणतेही काम न करता पगार घेत असतात. ते केवळ मस्टरवर सह्या करून निघून जातात. मात्र कोणतेही काम करीत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. त्यांचा बांधकाम विभागात कोणताही संबंध नाही. मात्र सुटीच्या दिवशी आमदार सुरेश भोळे यांना ते रस्त्याचे काम दाखविण्यासाठी का घेऊन गेले? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Jalgaon Corporation
भेदभाव सोपा, सर्वांना बरोबर घेण्याची क्षमता केवळ काँग्रेसकडे!

नगरसेविकेचे पती असल्यामुळे यांना अभियंता घाबरतात, त्यांना अधिकारी घाबरतात, त्यांना कोणाचीही बोलायची हिंमत होत नाही. त्यांना कशामुळे अधिकारी घाबरतात? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. ते महापालिकेत कामात ढवळाढवळ करतात. बैठकीला उपस्थित असतात, त्याकडे अधिकारी का लक्ष देत नाहीत? याबाबत आपण महापालिकेतील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे, मात्र त्यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही.

...तर मी कामाला लावतो

पती महापालिकेच्या सेवेत आहेत. परंतु अधिकारी त्यांना काम लावत नाही. जर ते अधिकाऱ्यांचे ऐकत नसतील आणि केवळ फुकटचा पगार घेत असतील, तर आपण त्यांना काम लावण्यास तयार आहोत. महापालिकेतील गटनेत्यांना दालन देण्यात आले आहे. त्याप्रमाणे मलाही शिवसेनेचा गटनेता म्हणून दालन देण्यात यावे. त्या ठिकाणी शिपाई म्हणून किरण बेंडाळे यांची नियुक्ती करावी.

अधिकाऱ्यांनी कारवाई करावी

महापालिकेत कार्यरत असणारे सर्व जण शासनाचा पगार घेत असतात. त्यामुळे त्यांनी काम केलेच पाहिजे. नगरसेविकेचा पती आहे म्हणून त्यांना कामात कोणतीही सूट नाही. नियम सर्वांना सारखेच आहेत, असे मत व्यक्त करून नगरसेवक जोशी म्हणाले, की किरण बेंडाळे यांना अधिकाऱ्यांनी त्वरित काम करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com