Dr Subhash Bhamre
Dr Subhash Bhamre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Budget News; रेल्वेसाठी शंभर कोटी मिळाले, धुळे रेल्वेस्थानक चकाकणार!

Sampat Devgire

धुळे : केंद्रीय बजेटमध्ये (Centre Government) मनमाड-धुळे-इंदूर (Dhule) रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा असलेल्या बोरविहीर ते नरडाणा या रेल्वेमार्गासाठी तब्बल १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांच्या पाठपुराव्याअंती पहिल्या टप्प्यातील रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल असा दावा खासदार डॉ.भामरे यांनी केला. (Dhule railway station renovation sanction in Budget)

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्ग हा धुळे मतदारसंघासाठी महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी गेले अनेक वर्षे पाठपुरावा सुरु आहे. त्यासाठी यंदाच्या अर्तसंकल्पात तरतूद करण्यात आली. त्यासाठी आपला पाठपुरावा यशस्वी झाल्याचा दावा खासदार डॉ. भामरे यांनी केला.

खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले, की केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अमृत योजनेतून देशातील ३०० रेल्वेस्थानकांचे अत्याधुनिकीकरण होणार आहे. त्यात धुळे रेल्वेस्थानकाच्या पाठपुराव्यातून समावेश करून घेण्यात यश आले आहे. त्यामुळे धुळे रेल्वेस्थानक कात टाकून अत्याधुनिक पद्धतीने सुशोभित आणि सर्व सुविधांनी सज्ज होणार आहे. धुळे मतदारसंघात सर्वांत महत्त्वाचा मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग आहे. या मार्गाला मंजुरी मिळवून घेत त्याचे प्रत्यक्षात काम सुरू करून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करीत आहे. त्या प्रयत्नांमुळेच मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून धुळे तालुक्यातील बोरविहीर ते शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा अशा ५० किलोमीटर लांबीच्या रेल्वेचे काम हाती घेण्यात आले आहे.

बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे. आता प्रत्यक्ष रूळ टाकणे आणि रेल्वेमार्ग तयार करणे यासाठी निधीची आवश्यकता असल्याने तो निधी मिळवण्याचा प्रयत्न केंद्राकडे सुरू केला. केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वेचे बजेट मंजूर केले जाते. त्यामुळे रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांची वेळोवेळी भेट घेत त्यांना बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी केली.

त्या मागणीला यश मिळून २०२३-२०२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयासाठी मंजूर बजेटमध्ये बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी १०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे, असे खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT