नाशिक : शहरातील (Nashik) देवळाली गाव हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यातील तीन माजी नगरसेवकांनीच शिंदे सेनेत (Eknath Shinde) प्रवेश करीत बंडखोरी केली. शिवसेनेला आव्हान दिले. त्याला थेट आव्हान देत देवळाली गावात शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी दमदार सभा घेतली. त्यामुळे बंडखोरांना चांगलाच घाम फुटला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी हा शिंदे गटाला इशारा मानला जातो. (Shivsena`s public meeting is a warning bell for rebel group)
शिवसेनेचे माजी नगरसेवक सुर्यकांत लवटे, आर. डी. धोंगडे, ज्योती श्याम खोले यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे बालेकिल्ल्यातच शिवसेनेची शक्ती घटल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी धडाकेबाज जाहीर सभा घेत बंडखोरांवर थेट वार केला. मुख्यमंत्री शिंदे गटाच्या बंडखोरीला आव्हान दिले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनपातील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि देवळाली प्रभागातील लवटे बंधूंसह दोन विद्यमान, चार माजी नगरसेवकांना फोडून शिंदे गटाने शिवसेनेला धक्का दिला, आज त्याच भागात आदित्य यांचा झालेला मेळावा उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचवणारा ठरला. आधी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या प्रभागात एका नव्या चेहेऱ्याला बळ दिल्यानंतर आज बंडखोरी केलेल्या एकाच प्रभागातील चार माजी नगरसेवकांविरोधात तसेच वातावरण निर्मितीसाठी आवश्यक असलेले जे जे गरजेचे आहे ते ते सगळे करीत साध्य करीत शक्तिप्रदर्शन साधले.
आजच्या सभेचा सूर हा शिवसेनेतून फुटलेल्या बंडखोरावर टिकेचाच राहिला. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिवजयंती बैठकीत वर्गणीची हिशेब मागितला म्हणून गोळीबार झाला, यात पालकमंत्री भुसे यांनी पोलिसांवर दबाव आणल्यामुळेच संशयितांना अटक झाली नाही, असा आरोप केला. श्री. दत्ता गायकवाड यांनी पेट्यांचं राजकारण करून नाशिकला लोक फोडले गेले, असा आरोप केला. माजी आमदार वसंत गिते यांनी खोक्याचे आणि पेट्यांचं राजकारण मोडून काढतील, असे स्पष्ट केले. उपनेते घोलप म्हणाले,‘‘जे गेले ते गेले, त्यांना आम्ही गाडू; पण गेलेल्या गद्दारांना पुन्हा पक्षात घेऊ नका.’’
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.