Uday Samant with leaders.
Uday Samant with leaders. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जिद्दीमुळेच मी वयाच्या २७ व्या वर्षी आमदार झालो

Sampat Devgire

नाशिक : ऊर्मी, जिद्दीला चांगल्या कामाची जोड दिल्याने वयाच्या २७ व्या वर्षी आपण आमदार (MLA) झालो. यश, अपयश पचवायला शिकलो. त्यामुळे तरूणांनी देखील समाज व व्यवस्था बदलण्यासाठी राजकारणात (Politics) राजकारणात यावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज येथे केले. (I am became MLA at the age of 27 yrs. said Uday Samant)

‘यिन’चे ‘चला घडू देशासाठी’ या दोनदिवसीय समर यूथ समीटला महाकवी कालिदास कलामंदिरात सुरवात झाली. या वेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी सिंधुदुर्गच्या राजकारणाचा उल्लेख करत राजकारण खिलाडूवृत्तीचे असावे, विकासाचे राजकारण असावे असे दाखले दिले. तसेच सोशल मीडियात चांगले आणि वाईट काय हे तरुणांनी ओळखायला शिकले पाहिजे. सध्या राजकारणासाठी महापुरुषांमध्ये फूट पाडण्याचे कटकारस्थान चालले आहे. अशा परिस्थितीत आपल्या महापुरुषांच्या महतीचे भोंगे सर्वत्र वाजायला हवेत, असे सांगितले.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील तरुणाई सामाजिकतेबद्दल सजग असून, समाजासाठी आदर्शवत कार्य तरुणाईने उभे केले आहे. पण एवढ्यावरच न थांबता तरुणाईने आता कोरोनामधील नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडत सकारात्मकता अंगी भिनवली पाहिजे. तसेच नेतृत्व अन् करिअरसाठी तरुणाईने पहिल्यांदा क्षेत्र निश्‍चित करावे, असे प्रतिपादन सामाजिक स्वास्थासाठी, सर्वांगीण विकासासाठी तरुणांनी पुढे यावे.

‘यिन’च्या शॅडो कॅबिनेटच्या बैठकीसाठी मी नाशिकमध्ये उपस्थित होतो. त्यानंतर ‘यिन’च्या दुसऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा आनंद मिळाला, असे सांगून श्री. सामंत यांनी ‘ऑनलाइन की ऑफलाइन’ अशी विचारणा करताच, ‘यिन’च्या सदस्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

ते म्हणाले, कोरोना अनेकांसाठी नुकसानकारक ठरला; परंतु परीक्षा रद्द केल्याने मी राज्यभर पोचलो, असे श्री. सामंत यांनी सांगताच, तरुणाईमध्ये हशा पिकला. लॅपटॉपवर माझे छायाचित्र लावून आरती करणारा तरुण, माझ्या छायाचित्राला मुकुट परिधान करून पोटावर ‘देवमाणूस’ लिहिलेले छायाचित्र मी सोशल मीडियात पाहिले, असे स्पष्ट करत असताना परीक्षा का रद्द केल्या याचा पुनरुच्चार श्री. सामंत यांनी केला. त्याचवेळी आता कोरोनानंतर सगळ्यात चांगल्या ऑफलाइन परीक्षा राज्यात झाल्याचे हे विद्यार्थ्यांनी दाखवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे प्रा. विजय नवले, युनिक अकादमीचे प्रमुख कपिल हांडे, प्रोट्रेडेक्स अकादमीचे महेंद्र सोनवणे, रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्टसिटीच्या अध्यक्षा स्वाती चव्हाण, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, माजी आमदार अनिल कदम आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT