नाना पटोलेंची नाराजी सरकार नव्हे `राष्ट्रवादी`च्या पदाधिकाऱ्यांबाबत

उदय सामंत म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : काँग्रेसच्‍या (Congress ) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकार नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांबाबत विधान केले आहे. उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्‍या प्रदेशाध्यक्षांनी त्‍याला समर्पक उत्तर दिलेले आहे. त्‍यामूळे या वादावर शिवसैनिक (Shivsena) म्‍हणून बोलणे उचित नाही. परंतु महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सांमत (Uday Samant) यांनी केले. (Congress leader Nana Patole given statement on NCP leaders, not about Government)

Uday Samant
राज ठाकरे म्हणाले, निर्धास्त रहा, मी तुमच्या पाठीशी!

मंत्री उदय सांमत यांनी आज यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या दीक्षांत समारंभानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

Uday Samant
ओबीसी आरक्षण; धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे यांचा राजीनामा!

ते म्हणाले, कुलपतींचे अधिकार अबाधित ठेवत कुलगुरु निवडीत बदल करतांना विद्यापीठात समान संधी मंडळ असावे तसेच मराठीचे संचालकपद असावे अशी आग्रही मागणी आहे. अधिसभा, व्‍यवस्‍थापन परीषदेत प्रतिनिधीत्‍वासाठी शैक्षणिक आर्हता असावी. यासह अन्‍य दुरुस्‍तीसंदर्भातील विधेयक राज्‍यपालांकडे स्‍वाक्षरीला गेलेले आहे. अद्याप स्‍वाक्षरी झालेली नसल्‍याची माहिती मिळत असून यासंदर्भात येत्‍या आठवड्याल राज्‍यपालांची भेट घेणार आहे. अध्यादेशावर स्‍वाक्षरी झाल्‍यानंतर कुलगुरु निवडीच्या प्रक्रियेला गती मिळेल. गुजरात राज्‍यात कुलगुरु निवडण्याची प्रक्रिया शासनाकडून होते. तशी तरी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतलेली नाही. त्‍यामूळे राज्‍यपालांच्‍या सहकार्याने हा मुद्दा लवकर निकाली काढू.

मंत्री सांमत म्‍हणाले, की परीक्षा ऑफलाइन घेण्यासंदर्भात शासनाने कुठलेही आदेश काढलेले नाहीत. कुलगुरुंच्‍या बैठकीत ठरलेल्‍या भूमिकेला समर्थन दर्शविले आहे. परीस्‍थिती सामान्‍य झालेली असतांना ऑफलाइन परीक्षेचा विद्यार्थी हिताची असल्‍याचा पुर्नउच्चार त्‍यांनी केला. तसेच महाविकास आघाडी सरकारच्‍या युवा संघटनांमार्फत यासंदर्भात विद्यापीठ हिताच्‍या दृष्टीने ऑफलाइन परीक्षेला विरोध न करण्याचे आवाहन त्‍यांनी केले.

सध्याचे राजकारण ढवळून निघालेले असतांना, क्‍लेश वाढलेले आहेत. अशा परीस्‍थितीत राज्‍याला व देशाला छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांच्‍या विचारांची गरज आहे. अनेक वर्षांपूर्वी या महापुरुषांनी सामाजिक समानता, सर्व जाती धर्म सलोख्याचा संदेश दिलेला आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com