Sadabhau Khot Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणूनच बघतो!

सदाभाऊ खोत म्हणाले, प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात त्यात वावगे काहीच वाटत नाहीत.

Sampat Devgire

सोलापुर : सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी `तो` शपथविधी आठवावा मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे झाले की नाही. प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात आणि मग उपमुख्यमंत्री त्यात वावगं काय?. मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना मुख्यमंत्री म्हणूनच बघतो, असा कुत्सीत टोला माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी लगावला आहे. Sadabhau Khot said state Government will fall soon)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देहू (पुणे) येथील संत तुकाराम शीळा मंदीराच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजति पवार यांना बोलू दिले नाही. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. त्यामुळे जनतेत नाराजी आहे. त्याच्या तीव्र प्रतिक्रीया येत असताना, श्री. खोत यांनी मात्र फडणवीस व भाजपची बाजू लाऊन धरली आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी आठवा. त्यात फडणवीस मुख्यमंत्री तर श्री. पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते. मग मुख्यमंत्री बोलले तर त्यात वावगं काय?, असा प्रश्न त्यांनी केला.

ते म्हणाले, एकाद्याला लग्न करायची हौस असते. लग्न करुन बायको घरात आली, लेकरं बाळं झाली तरी पत्नीला धड कपडाही मिळत नसतो. कारण नवरा हा चैनीखोर असतो. तो गावभर फिरत असतो. सांगतो की बायको पळून जाणार आहे. त्याला लग्न करताना तुला कळले नाही का?. तु चैनी करणार त्यांना धड कपडा देणार नाही. घराकडे लक्ष देणार नाही, मग वर बायको पळून जाणार म्हणून बोंब मारतोस. आधी घराकडे लक्ष दे, असे त्यांनी महाविकास आघाडीतील मतभेदाच्या बातम्यांबाबत म्हटले.

ते पुढे म्हणाले, सरकार हे काय छप्पर आहे काय की बांबू काढले म्हणून पडणार. सरकार हे आपोआप पडणार आणि ते पडलेले आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT