आमदार दिलीप बनकर यांची घरच्या मैदानावरच दमछाक!

भास्करराव बनकर यांचा गनिमी कावा अन् तगडया फिल्डींगमुळे आमदार दिलीप बनकर यांची कोंडी
Dilip Bankar News, Bhaskarrao Bankar News, Nashik Latest Marathi News
Dilip Bankar News, Bhaskarrao Bankar News, Nashik Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

एस. डी. आहीरे

पिंपळगाव बसवंत : विधानसभा निवडणुकीत साथसंगत केली ते घरच्या सोसायटीच्या निवडणुकीत विरोधी गटाचे उमेदवार झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांची काहीशी कोंडी झाली आहे. त्यामुळे घरचा किल्ला राखण्यासाठी भास्करराव बनकर (Bhaskarrao Bankar) आणि मविप्रचे माजी संचालक विश्‍वासराव मोरे हे तगडे प्रतिस्पर्धी असल्याने चुरस निर्माण झाली आहे. (Pimpalgaon Baswant society election became prestigious for Dilip Bankar)

Dilip Bankar News, Bhaskarrao Bankar News, Nashik Latest Marathi News
सामान्यांच्या प्रश्नावर लढल्यानेच गांधी कुटुंबियांवर `ईडी`ची त्रास!

पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणुक चुरशीची बनली आहे. विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भास्करराव बनकर यांच्यात पॅनेलमध्ये ही राजकीय लढाई आहे. (Dilip Bankar News)

Dilip Bankar News, Bhaskarrao Bankar News, Nashik Latest Marathi News
आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर; असा असेल दौरा

आमदार बनकर यांनी नव्या-जुन्या संगम घडवत बलाढ्य उमेदवार दिले. त्यात निफाड साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तानाजी बनकर, भास्करराव बनकर व दिलीप मोरे यांनी लावलेली व्यूहरचना दे-धक्का देणारी ठरणार का, याची उत्सुकता आहे. आमदार बनकर यांनी प्रचाराच्या शुभांरभात शक्तीप्रदर्शन केले. मात्र माजी सरपंच बनकर व मोरे यांनी साधेपणाने प्रचाराचा सुरूवात करून गनिमी काव्याने सोसायटीचा गड जिंकण्याची तयारी केली आहे. तसे झाल्यास सुमारे अकराशे मतदार येत्या शनिवारी निवडणकीत संमिश्र कौल देऊ शकतात. (Nashik Latest Marathi News)

आमदार दिलीप बनकर व माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्यातील राजकीय संघर्षाचा नवा अध्याय पिंपळगाव सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने रंगला आहे. पिंपळगावातील कोणत्याही संस्थेची निवडणूक म्हटली की, आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या शिवाय राहत नाही. पण पिंपळगाव सोसायटी निवडणुकीचा सुरू असलेला रणसंग्राम त्याला अपवाद ठरला आहे. टीकेचे बाण न सोडता नेते व उमेदवार मतदारांना आम्हाला कौल द्या, अशी गळ घालत आहेत. त्यामुळे ही निवडणूक वरकरणी शांत वाटत असली तरी बनकर द्वयींची प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे. त्यामुळे दोघांनी प्रत्येक मतदारामागे टाईट फिल्डींग लावली आहे.

जिल्ह्यात कर्जवाटपासह उलाढालीत अव्वल असलेल्या पिंपळगाव सोसायटीची अवस्था जिल्हा बॅकेने कर्जपुरवठा थांबविल्याने इतर संस्थाप्रमाणेच झाली आहे. कर्जवाटपाचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत थांबला असला तरी खतविक्री दुकान, रेशन दुकान, गाळे भाडे हे उत्पन्न कायम आहे. पिंपळगाव शहरातील राजकीयदृष्ट्या एक महत्त्वाचे सत्ता केंद्र असलेल्या विविध कार्यकारी संस्थेची सत्ता आपल्या हातात असावी म्हणून आमदार बनकर व माजी सरपंच बनकर यांनी अनुक्रमे शेतकरी विकास व नम्रता पॅनलची निर्मिती करून सभासदांपुढे कौल मागत आहे.

संस्थेच्या गत निवडणुकीत दोन्ही बनकर एकत्र लढत पूर्ण सत्ता काबाजी केली होती. पण बनकर द्वयींमधील राजकीय संघर्ष गेल्या सहा वर्षात एवढा पेटला, की तो विझणे आता काहीसे मुश्‍कील झाल्यासारखे वाटते.

पालखेड गटात जिल्हा परिषद निवडणूक व पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार बनकर यांनी माजी सरपंच बनकर यांना जोरदार शह दिला. विशेषता पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या तीस वर्षाच्या अभेद्य सत्ता गडाला आमदार बनकर यांनी हादरा दिल्याने भास्करराव बनकर यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्‍न चिन्ह उभे राहिले होते. आमदार बनकर यांच्या सत्तेचा वारू चौफर उधळला.

आरोप- प्रत्यारोप मात्र टाळले

पिंपळगाव सोसायटी निवडणुकीच्या निमित्ताने दोघे बनकर पुन्हा एकदा समोरासमोर ठाकले आहेत. सामाजिक व घराण्याची सांगड घालत परस्परासमोर तगडे उमेदवार दिले आहेत. संस्थेच्या मावळत्या सत्तेत दोघेही भागीदार असल्याने निवडणूक प्रचारात आरोप करण्याचे टाळलेले दिसते. त्यामुळे निवडणूक काहीशी सुनीसुनी वाटते. पण महत्त्व मात्र तेवढेच आहे, कारण पिंपळगाव बाजार समितीच्या आगामी निवडणुकीचा मार्ग येथूनच प्रशस्त होणार आहे. आमदार बनकर यांच्या शेतकरी विकास पॅनलला बलाढ्य उमेदवार दिसत असले तरी त्यात काही कमजोर कडीही आहेत.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com