Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

टीका करणाऱ्यांना मी नेहमीच कामातून उत्तर देतो

Sampat Devgire

धरणगाव : मी टीका (Criticism) करणाऱ्यांना नेहमीच कामाच्या (Work) माध्यमातून उत्तर देत असतो. लोकांसाठी विकास (Devolopment) हे माझे ध्येय आहे. त्यामुळे लोकांसाठीच मी काम करीत असतो, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. (Gulabrao patil says, I always reply my opposition through work)

दिवाळीनिमित्त साळवा येथे झेंडा चौक येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. ते म्हणाले, ३५ वर्ष सतत संघर्ष करून शिवसेना वाढीसाठी काम केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ध्येय व धोरणे टिकविण्यासाठी आम्ही उठाव केला असून, मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी व हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व जोपासण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्यांनी विरोधकांवर तुफान फटाकेबाजी केली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अनेक ठिकाणी औक्षण केले. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.

नांदेड (जळगाव) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी निधी मंजूर केला असून, कामाला सुरुवातही झाली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ४.३२ कोटीची मंजूर पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ग्रामपंचयातीजवळील लहान पुलाचे काम नाबार्डमधून मंजूर करणार असून स्मशान भूमीलगत शेत रस्त्याचा काम, तसेच साळवा ते पष्टाणे रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असून, साळवा व परिसराचा बॅक लॉग भरून काढणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

तालुकाप्रमुख गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच ईशाताई बोरोले, ग्रा.प.सदस्य योगिनी नारखेडे, प्रिया इंगळे, जयश्री इंगळे, रजनी बोरोले, उपतालुका प्रमुख मोतीआप्पा पाटील, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, प्रमोदबापू पाटील आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT