नाशिक : नाशिक महापालिका निवडणुक (NMC) गेल्या आठ महिन्यांपासून खोळंबली आहे. इच्छुकांनी केलेली सर्व तयारी आणि साखरपेरणी वाया गेली आहे. मात्र निवडणुकीची कोणतिही चिन्हे नाहीत. नाशिकला (Nashik) शिंदे गटाचे (Eknath Shinde)दादा भुसे (Dada Bhuse) पालकमंत्री झाल्याने भाजपच्या (BJP) तयारी ठप्प झाली आहे. भाजपच्या पदाधिकारी, इच्छुक निवडणुकीची जबाबदारी असलेल्या भाजप नेते गिरीश महाजनांच्या (Girish Mahajan) निरोपाची प्रतिक्षा आहे. (Eknath Shinde Group`s Minister Dada Bhuse wants to establish in MNC)
नाशिक महापालिका निवडणुकीची होणार होणार म्हणता सतत लांबणीवर पडत गेली आहे. यामध्ये मावळते सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे ६६ नगरसेवक होते. या सर्व नगरसेवकांनी पुन्हा उमेदवारी मिळेल या अपेक्षेने प्रभागात जनसंपर्क, प्रचार व अनुयायांमध्ये साखरपेरणी देखील जोमात केली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्यांनी आपले राजकीय आडाखे बांधून निवडणुक न घेता प्रशासकांची नियुक्ती केली होती. त्यामुळे या सर्व नगरसेवक व इच्छुक उमेदवारांची निराशा झाली. त्यांनी केलेली सर्व तयारी वाया गेली.
महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने प्रारंभी जयकुमार रावल यांची नियुक्ती केली होती. मात्र त्यानंतर त्यात बदल करीत सध्याचे मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केल्याने भाजपचा एक गट नाराज झाल्याचे बोलले जाते. त्यातच राज्यात भाजपच्या पाठींब्यावर एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यावर श्री. महाजन पालकमंत्री होतील या अपेक्षेने भाजपच्या कार्यकर्त्यांत जोष होता. श्री. महाजन यांनी देखील नाशिकला दोन वेळा दौरे केले. त्याने महाजन समर्थकांत उत्साह होता. मात्र ती अपेक्षाही फोल ठरली.
नाशिकला शिंदे गटाचे दादा भुसे यांची पालकमंत्री नियुक्ती केल्याने शहर व जिल्ह्याचे राजकारणच गोंधळात सापडले. सध्या श्री. भुसे शिंदे गट प्रबळ व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी महापालिका तसेच जिल्हा परिषदेत स्वतंत्र बैठका घेऊन प्रशासकीय कामकाजावर आपला प्रभाव टाकले. काही बैठका घेताना त्यांनी भाजप तसेच अन्य घटकांना जाणीवपूर्वक लांब ठेवल्याचा समज निर्माण झाला. त्याने अनेक भाजपचे नेते दुखावले.
या सर्व घटनांचा परिणाम थेट महापालिका निवडणुकीबाबत अनिश्चितता निर्माण होण्यात झाला. राज्यातील राजकारण तसेच एकनाथ शिंदे विरूद्ध ठाकरे गट यांच्यातील राजकीय संघर्ष पाहता नाशिकमध्ये शिवसेना एकसंघ आहे. शिवसेनेवर काहीही परिणाम झालेला नाही. या सर्व घडामोडीत भाजपच्या महापालिका निवडणूक तयारीवर विपरीत परिणाम झाला आहे. सर्व वातावरण थंड आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.