https://www.youtube.com/watch?v=_c-CPg_G2xUChhagan Bhujbal on Mumbai Politics : माजी खासदार समीर भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे भुजबळांच्या आगामी राजकारणाबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Sameer Bhujbal is now NCP`s Mumbai city president of NCP)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीत येवला (Nashik) मतदारसंघात मुक्तिभूमीचा वर्धापन दिनाच्या नियोजनासाठी बैठक झाली.
माजी खासदार समीर भुजबळ मुंबईचे शहराध्यक्ष झाले. त्यामुळे त्यांचा बहुतांश वेळ आता मुंबईच्या राजकारणाची घडी बसविण्यात जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटासोबत गेलेल्या भुजबळ यांना पक्षाने मोठे पद दिले आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर सर्वच पक्षांचे अतिशय बारीक लक्ष आहे. अनेक नेत्यांना या निवडणुकीविषयी उत्सुकता आहे. त्यादृष्टीने ही जबाबदारी महत्त्वाची मानली जाते.
यासंदर्भात मंत्री भुजबळ यांचे बहुतांशी राजकीय व प्रशासकीय कामकाजात समीर भुजबळ यांची महत्त्वाची भूमिका असल्याने भुजबळ आता नाशिकच्या राजकारणात किती सक्रिय राहणार? अशी अस्वस्थता भुजबळ समर्थकांत होती.
यासंदर्भात येवला येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी भुजबळ यांनी आपण नाशिकच्या राजकारणात कायम असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने मला मुंबईचा पक्षनेता केले आहे. आम्ही नाही म्हणत असतानाही पक्ष संघटनवाढीसाठी पक्षनेत्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांना मुंबईचे अध्यक्षपद दिले आहे. याचा अर्थ आम्ही नाशिक सोडून चाललो अशातला काही भाग नाही. मुंबईसह नाशिकची जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.