Suhas Kande News, Eknath Shinde News, Shivsena News, Nashik News
Suhas Kande News, Eknath Shinde News, Shivsena News, Nashik News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मला मंत्री करा, असे एकनाथ शिंदेंना कधीही म्हटलो नाही!

Sampat Devgire

नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्याचे मुख्यमंत्री झाले. यासाठीच आमच्या सगळ्यांचे मनापासून प्रयत्न होते. त्यातच मी समाधानी आहे. मला मंत्री करा, असे मी त्यांना कधीही म्हणालो नाही, असे बंडखोर शिवसेना (Shivsena Rebel) गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी `सरकारनामा`ला सांगितले. (Rebel MLA Suhas kande happy with Eknath Shinde became CM)

आमदार कांदे म्हणाले, गेले महिनाभर राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींचे आम्ही साक्षीदार आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, याचा अर्थ आम्ही विचारसरणी बदलली असा होत नाही. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हीच आमच्या सगळ्यांची इच्छा होती. त्यासाठीच आम्ही सर्व काही केले आहे. आता शिंदे मुख्यमंत्री झालेत. त्यातच आम्हाला खुप आनंद आहे. (Suhas Kande Latest Marathi News)

आमदार कांदे मंत्री होणार अशी त्यांच्या समर्थकांत चर्चा आहे. याबाबत त्यांचे समर्थक सतत ते मंत्री होतील असे सांगत असतात. यासंदर्भात श्री. कांदे म्हणाले, मी कधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मला मंत्री करा असे म्हटलो नाही. आमचा मुख्य उद्देश श्री. शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हा होता. तो पूर्ण झाला. त्यामुळे त्यांनी मला मंत्री केले तर आनंदच आहे. मंत्री म्हणून चांगले काम करून दाखवीन. नाही केले तरी, लोकांची कामे करीत आहोत. ते सुरु राहतील. राज्यात आमच्या विचाराचे सरकार आहे. त्यामुळे आम्हाला काय हवे, नको ती विकासाची कामे वेगाने होतील.(Nashik latest Marathi News)

सर्वोच्च न्यायालयाचा अंतरीम सुनावणी काल झाली. त्या बंडखोर गटाला दिलासा मिळाला. याबाबत ते म्हणाले, आता राज्यात सरकार स्थापन होऊन मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. फारशा अडचणी नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा पुढील निकाल देखील आमच्याच बाजुने असेल, असे मला वाटते. यासंदर्भात अनेक निवाडे आहेत. न्यायमूर्तींनी व्यक्त केलेली मते आहेत. त्याचा आधार घेऊन निकाल बंडखोर गट हीच खरी शिवसेना असा निकाल येईल, याबाबत आम्ही आशावादी आहोत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT