Chitra Wagh
Chitra Wagh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chitra Wagh; लव्ह जिहाद विरोधात कायद्याचा आग्रह धरू

Sampat Devgire

नाशिक : लव जिहादचे (Love Jihad) प्रकार टाळण्यासाठी उत्तर प्रदेशच्या (UP) धर्तीवर महाराष्ट्रात (Maharashtra) लव जिहाद विरोधात कायदा व्हावा. महिलांवरील अत्याचाराच्या (Women attrocity) घटनांवर लवकर निर्णय होण्यासाठी स्वतंत्र विशेष न्यायालय उभारावीत यासाठी भाजप (BJP) महिला मोर्चा राज्य शासनाकडे आग्रह धरणार आहे, अशी माहिती भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिली. (BJP womens state president Chitra Wagh deemands Specila courts for womens attrocity)

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आजपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या वाघ यांनी आज त्र्यंबकेश्वर आधारतिर्थ तसेच म्हसरुळ आश्रमशाळेतील खून तसेच महिला अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तांना भेटून पोलिस कारवाईची माहिती घेतली. त्यानंतर महिला मेळाव्यापूर्वी भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, केदा आहेर आदी उपस्थित होते.

चित्रा वाघ म्हणाल्या, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या शंभर दिवसात अनेक चांगले निर्णय घेतले आहे. भयमुक्त महाराष्ट्रासाठी महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे डझनभर पोलिस अधिकारी निलंबित करीत सरकारने संवेदनशीलता दाखविली आहे. महिलांवरील अत्याचारांवर नियंत्रणासाठी महिलांसाठी स्पेशल एक्स्‍लुझिव्ह कोर्ट उभारण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने विशेष अधिवेशनाची मागणी केली होती. मात्र तेव्हा श्री ठाकरे यांच्याकडून भाजपप्रणित राज्यातील महिला अत्याचाराच्या संख्या सांगून या विषयाला बगल दिली गेली असा आरोप केला.

महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या बाबतीत यापूर्वी कायमच विविध राजकारणी नेत्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालविले जातील अशा घोषणा केल्याचे ऐकायला मिळाले, वास्तविक असे फास्ट ट्रॅक कोर्ट काय आहे, त्यांची संख्या किती याची मात्र कुठेच माहिती नाही. त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या अशा कोर्टांचे आश्वासन देत आधीच्या सरकाराकडून झुलविले गेले. महिलेला मुख्यमंत्रिपदी नियुक्तीचा विचार स्वागतार्ह असला तरी, पदाला न्याय मिळणे तितकेच महत्त्वाचे असते. मंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपाच्या अनुषंगाने माझी न्यायालयीन लढाई सुरूचं राहणार आहे. राठोड यांना महाविकास आघाडी सरकारच्याच काळात क्लिन चीट दिली गेली असे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT