Gujrat Issue; महाराष्ट्रातील ५५ गावे गुजरातमध्ये विलीनीकरणावर ठाम.

सुरगाण्याच्या ५५ गावांतील आदिवासी गुजरातमध्ये जाण्यावर ठाम असुन त्यासाठी संघर्ष समिती स्थापन झाली.
Surgana villagers
Surgana villagersSarkarnama

नाशिक : आमचे प्रश्न सोडवा अन्यथा गुजरातला (Gujrat) जोडा यावर एक दोन नव्हे ५५ गावांतील आदिवासींचे (Tribles) एकमत अद्यापही ठाम आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते चिंतामण गावीत (Chintaman Gavit) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली. ही समिती उद्या (ता.५) गुजरातच्या डांग (Dang) जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदण देणार आहे. (Maharashtra- Gujrat borders villagers will meet Dang Collector Tommarow)

Surgana villagers
Shivsena; हेमंत गोडसेंना कचऱ्याच्या डब्यात टाकू!

यासंदर्भात आज पांगारणे गावात कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चिंतामण गावीत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार देखील उपस्थित होते. आमदार पवार यांनी तुमचे सर्व प्रश्न पालकमंत्री व जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मांडतो. ते तातडीने सोडविले जातील यासाठी पाठपुरावा करीन, असे आश्वासन दिले. मात्र त्यावर आदिवासींचे समाधान झाले नाही.

Surgana villagers
Sanjay Raut; हिंमत असेल तर संजय राऊत यांनी नाशिकमध्ये निवडणूक लढवावी!

सीमावर्ती भागातील आमची वाडे- पाडे... राज्य शासनाचा भल्या मोठ्या घोषणा; पण त्या कुणासाठी? दाद मागितली तरी दखल घेतली दात नाही. निवडणुकीपुरतीच आमची आठवण येते. नंतर मात्र आम्ही उघड्यावर, अशी स्थिती आहे.

गुजरात सीमावर्ती भागातील गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ही गावे गुजरातमध्ये विलीन करावी, या मागणीचे निवेदन सादर करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांच्या भूमिकाबाबत राष्ट्रवादीने हात झटकले आहे.

गुजरातमध्ये गावे विलीन करण्याची गावित यांची मागणी वैयक्तिक असल्याचे राष्ट्रवादी पक्षाने जाहीर केले. त्यामुळे गावित तालुकाध्यक्षासह राष्ट्रवादीचा राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत आहेत. याबाबत रविवारी या गावांमधील ग्रामस्थांच्या होत असलेल्या बैठकीत गावित आपली भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. या गावांना मूलभूत सुविधा न पुरवून शासन या गावांवर अन्याय करत आहे. त्यासाठी या गावांच्या विकासासाठी भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे गावित यांनी स्पष्ट केले.

यावेळी सरपंच राजेंद्र गावीत (डोल्हारा), अशोक गवळी (बोरगाव) रणजीत गावीत, (आनंदा झिरवाळ (खुंटविहीर) तुळशीराम महाले (मांदा), मजिद जौधरी (कुकडणे), तुकाराम देशमुख (म्हैसखडक), नवसु गायकवाड, गोपाळराव धुम, संतोष देशमुख, हेमंत पाटील, राजु पवार, युवराज लोखंडे, काशिनाथ वाघमारे, बाळु गावीत, ज्योतिंग बागुल, दौलत महाले, वसंत पवार, भास्कर अलबाड, दिपक मेघा, राकेश महाले, रामदास केगा, वसंत गावीत आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com