Sanjay Raut & Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar News : मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली, तर बिघडले कुठे?

खासदार राऊत म्हणाले, पंतप्रधान चांगले काम करीत असतील तर आम्हीही त्यांची स्तुती करू

Sampat Devgire

Sanjay Raut On Ajit Pawar : अजितदादा यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली तर बिघडले कुठे? त्यांची अपेक्षा योग्य आहे, काही जण तर लायकी नसतानाही तोडफोड आणि जुगाड करून मुख्यमंत्री होतात. असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. ( Sanjay Raut said, nothing wrong in Ajit Pawar statement)

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान मोदींची (Narendra Modi) स्तुती केली तर बिघडले कुठे? पंतप्रधान चांगले काम करीत असतील तर आम्हीही त्यांची स्तुती करू.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्या पा‍र्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगाव येथील हॉटेल के. पी. प्राइड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेस जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेत घुसण्याची धमकी दिली होती. त्याबाबतीत बोलताना खासदार राऊत म्हणाले, की सत्ता आणि पैशाच्या जोरावर राज्याचे मंत्री धमकी देत आहेत.

राज्यात कायदा सुव्यवस्था असल्याचे सांगणारे गृहमंत्री कुठे आहेत? मुख्यमंत्री कुठे आहेत? मात्र अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाहीत. आम्ही पळपुटे नाही, डरपोकही नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही त्याचा सामना करण्यास सज्ज आहोत.

मर्दानगी असावी लागते

पालकमंत्री पाटील यांनी पक्षांतर केल्याबाबत टोला लगावला. ते म्हणाले, पळपुटेपणा करून हे शिंदे यांच्याबरोबर गेले. केवळ दाढी, मिशी असून चालत नाही, तर त्यासाठी मर्दानगीही असावी लागते. आमचाही छळ होत आहे, आम्हालाही कारागृहात जावे लागले. परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. परंतु यांना वर्षानुवर्षे शिवसेनेने दिलं, मोठे केले तरी हे पळून गेले. आम्ही शिंदे यांच्याबरोबर का गेलो? याचे उत्तर त्यांनी द्यावे. जनता त्यांना निवडणुकीत उत्तर देणारच आहे.

‘महाविकास आघाडी’च सत्तेवर येईल

राज्यातील महाविकास आघाडीच्या वज्रमुठीबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, एका पक्षाची नव्हे तर तीन पक्षांची ही वज्रमूठ आहे, ती कायम एकच राहील. २०२४ मध्ये राज्यात महाविकास आघाडीच सत्तेवर येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT