Karnataka Election : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या BJP उमेदवाराकडून २१ लाखाची रोकड, चांदीच्या वस्तू जप्त..

Case Filed Against Murugesh Nirani : मुख्यमंत्रीपदासाठी निरानी यांचे नाव आघाडी असल्याची चर्चा आहे.
 Murugesh Nirani
Murugesh Nirani Sarkarnama

Case Filed Against Murugesh Nirani : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषे दाखवली जात आहेत,

बिल्गी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार, उद्योगमंत्री मुरुगेश निरानी यांच्याविरोधात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या साखर कारखान्यातील कर्मचारी वसाहतीतून २१ लाख रुपये आणि चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

उद्योग मंत्री मुरुगेश निरानी भाजपमधील बडे नेते आहेत, जेव्हा बसवराव बोम्मई यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनविण्यात आले तेव्हा निरानी यांचेही नाव आघाडीवर होते. या निवडणुकीतही मुख्यमंत्रीपदासाठी निरानी यांचे नाव आघाडी असल्याची चर्चा आहे.

 Murugesh Nirani
Ajit Pawar मुख्यमंत्री होऊ शकतात..; खडसेंनी मांडले अजितदादांच्या सीएमपदाचं गणित

उद्योग मंत्री निरानी पर यांच्यावर मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे मुधोल पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी सांगितले.

मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) मनोज कुमार मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुधोल पोलिसांनी २८ किलो वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत २५३ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. निरानी यांच्या साखर कारखाना परिसरातून १.८२ कोटी रुपयांची रोकड, ३७.६४ लाख रुपयांच्या भेटवस्तू, ४५.२५ लाख रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहे.

 Murugesh Nirani
Appasaheb Dharmadhikari News : 'माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर.., मी पुरस्कार परत करणार'; धर्माधिकारी 'ते' पत्र खोटे

निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत केलेली कारवाई

  • ८२.०५ कोटी रुपयांची रोकड जप्त

  • १९.६९ कोटीं रुपयांच्या वस्तू

  • ५६.६७ कोटी रुपयांची दारु

  • १६.५५ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ

  • ७३.८ कोटी रुपयांचे सोने

  • ४.२६ कोटी रुपयांची चादी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com